मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाना पटोलेंच्या 'त्या' भूमिकेवर शरद पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी, म्हणाले...

नाना पटोलेंच्या 'त्या' भूमिकेवर शरद पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी, म्हणाले...


मविआमध्ये कुठलाही वाद नाही. नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं आहे.

मविआमध्ये कुठलाही वाद नाही. नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं आहे.

मविआमध्ये कुठलाही वाद नाही. नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

मुंबई, 11 फेब्रुवारी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी आता बाहेर आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या भूमिकावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

मविआमध्ये कुठलाही वाद नाही. नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं आहे. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही एवढीचं व्यथा आहे, पण आता तो विषय संपला आहे, असं शरद पवार म्हणाले.

(भाजपचं मिशन 200, आज नाशिकमध्ये ठरणार मेगा प्लॅनिंग)

भाजपाने त्यांच्या पक्षात काय करावे त्यांचा प्रश्न, अनिल देशमुख १ वर्षे जेलमध्ये होते. संजय राऊत देखील जेलमध्ये होते. नवाब मलिक आजही जेलमध्ये आहे. राज्य पातळीवर काम करणाऱ्या या नेत्यांना पाहता त्यांच्या भूमिकेचा विचार त्यांनी करावा, असंही पवार म्हणाले.

अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्याबळ नाही, संख्याबळ असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असं पवार पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले.

मुंबई मनपाची निवडणूक पाहुन मोदी महाराष्ट्रात येत आहे हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येवून राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा, असा टोलाही पवारांनी मोदींना लगावला.

(राष्ट्रवादीचे आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात! अश्लील व्हिडीओ बनवून मागितली खंडणी)

राज्यात पत्रकारांवर हल्ला झाला. काँग्रेसच्या महिला आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरही हल्ला झाला. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यावरुन ज्यांची जबाबदारी आहे ते याबाबत कितपत लक्षात घेता याबाब शंका आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही पवारांनी फडवणीसांना लगावला.

'केंद्राच्या सहकार परिषदेत भाजपचे आमदार आणि मंत्री अतुल सावेंचा मुद्दा उपस्थित करणार आहे, केंद्राच्या विसंगत राज्य सरकारचे प्रतिनिधी धोरण मांडत आहे, अशी नाराजी शरद पवारांनी व्यक्त केली.

First published:
top videos

    Tags: Nana Patole, Sharad Pawar