मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: राजकारणातील वैरी एकत्र आले अन् गळ्यात गळे घालून भेटले, राऊत - फडणवीस - दरेकरांच्या भेटीने चर्चांना उधाण

VIDEO: राजकारणातील वैरी एकत्र आले अन् गळ्यात गळे घालून भेटले, राऊत - फडणवीस - दरेकरांच्या भेटीने चर्चांना उधाण

राजकीय आखाड्यात कुस्ती खेळणारे राऊत, दरेकर अन् फडणवीसांची कार्यक्रमात दिसली दोस्ती

राजकीय आखाड्यात कुस्ती खेळणारे राऊत, दरेकर अन् फडणवीसांची कार्यक्रमात दिसली दोस्ती

Sanjay Raut, Devendra Fadnavis and Pravin Darekar together: एकमेकांवर टीका करणारे राजकारणातील दिग्गज नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गप्पा मारताना दिसून आले.

  • Published by:  Sunil Desale

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 20 नोव्हेंबर : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नसतं. कधी कुठला नेता कुठल्या पक्षात उडी घेईल याचा नेम नसतो. तशाच प्रकारे एकमेकांवर दररोज टीका करणारे नेते एकत्र आले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. असाच प्रकार नाशकात आज पहायला मिळाला. दररोज एकमेकांवर टीका करणारे संजय राऊत (Sanjay Raut), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे एका कार्यक्रमात एकत्र मनमोकल्या गप्पा मारताना दिसून आले.

झालं असं की, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. याविवाह सोहळ्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी संजय राऊत आणि प्रविण दरेकर हे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गप्पा मारत होते. तर त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही गप्पा मारताना दिसून आले.

एकमेकांवर सातत्याने टीका करणारे राजकीय नेते एकत्र येत गप्पा मारताना पाहून सर्वांच्याच भूवया उंचावल्या गेल्या. तसेच राजकीय वर्तुळात चर्चाही रंगण्यास सुरुवात झाली. याच कार्यक्रमात एका सोफ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ आणि संजय राऊत एकत्र बसल्याचंही पहायला मिळत आहे.

वाचा : "आम्ही करेट कार्यक्रम केला अन् दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला" : संजय राऊत

याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात हस्तांदोलन झाल्याचंही पहायला मिळालं. त्यानंतर संजय राऊत, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्यातं दिसून आलं.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पहायला मिळाली. संजय राऊत, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ एकाच सोफ्यावर बसल्याचं दिसून आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. तर काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि छगन भुजबळ यांच्यातही उडाले होते. शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यावरून खटके उडाले होते. खुर्च्यांसाठी एकमेकांवर टीका करणारे नेते एकाच सोफ्यावर बसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.

कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले...

राजकीय नेते एकत्र आल्यावर याबाबत विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या संस्कृतीत काही प्रसंग असे आहेत मग ते निधन असो किंवा घरातील एखादे मंगलविधी असो.. अगदी एखाद्या कुटुंबात पाच भाऊ असतात ते खूप भांडतात आणि वाटण्या करतात, दोन भावांच्या बायका एकमेकांकडे पाहत नाहीत पण लग्नाला येतात सर्वजण एकत्र.

यानंतर चंद्रकांत पाटील यांना विचारले की, अशाच दोन जुन्या भावांनी एकत्र यावं अशी काही शक्यता वाटते का आपल्याला? त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, यावर मी काही टिप्पणी केली नाही., मी एक ग्रामीण माणूस आहे सोपं उदाहरण दिलं की, पाच भाऊ भांडतात आणि लग्नाला एकत्र येतात.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Nashik, Pravin darekar, Sanjay raut