मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'शिंदे गटातील सगळे परत येतील, पण 'त्या' माणसाला घेणार नाही', संजय राऊतांचा मोठा दावा

'शिंदे गटातील सगळे परत येतील, पण 'त्या' माणसाला घेणार नाही', संजय राऊतांचा मोठा दावा

संजय राऊत

संजय राऊत

संजय राऊत आज मालेगावर दौऱ्यावर आहेत, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 17 मार्च : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 26 मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेडमध्ये सभा झाली होती. त्यानंतर ते राज्यातील इतर ठिकाणीही सभा घेणार आहेत. 26 मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

शिंदेंना टोला 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत पुन्हा सगळे येतील, पण आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो गद्दारांचा नाही म्हणत त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरित्या दादा भुसे यांना देखील टोला लगावला आहे. राज्यातील मुस्लिम समाजही आमच्या पाठिमागे असल्याचा दावा यावेळी राऊत यांनी केला आहे.

राज्य सरकारवर निशाणा

दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी राज्य सरकारवर देखील घणाघाती टीका केली आहे. राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यात सरकार आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीही घरी जावे लागू शकते हे त्यांना माहित आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीस प्रकरणावर राऊत पहिल्यांदाच बोलले; देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप!

निवडणुका एकत्र लढवणार  

विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवणार आहोत. जागा वाटपावरून कोणताही वाद होणार नाही, याची खात्री मी देतो महापालिकांसंदर्भात देखील चर्चा सुरू आहे. ज्या मोठ्या महापालिका आहेत त्या ठिकाणी एकत्र लढण्याची इच्छा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Nashik, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray