मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मालेगावात गुंडांचा हैदोस, चार जण आले, बंदुकीचा धाक दाखवला, आणि.....

मालेगावात गुंडांचा हैदोस, चार जण आले, बंदुकीचा धाक दाखवला, आणि.....

मालेगाव शहरात गुंडांच्या टोळीने हवेत गोळीबार केला. या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली.

मालेगाव शहरात गुंडांच्या टोळीने हवेत गोळीबार केला. या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली.

मालेगाव शहरात गुंडांच्या टोळीने हवेत गोळीबार केला. या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली.

मालेगाव, 5 ऑगस्ट : राज्यात अराजकतेला आळा घालण्यासाठी पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. पण तरीही खून, बलात्कार, दरोडा सारख्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. बीडमध्ये नुकतंच एका ठिकाणी सशस्त्र दरोडा पडल्याची घटना ताजी असताना मालेगाव शहरदेखील एक अशाच घटनेने हादरलं आहे. मालेगाव शहरात गुंडांच्या टोळीने हवेत गोळीबार केला. या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. गुंड दरोडा टाकण्याच्या बेतात होते. त्यासाठी त्यांनी कारखानदाराला धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्याला दमदाटी देत बंदूक दाखवली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारातून कारखानदार बचावला. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांना सुगावा लागला. त्यामुळे दरोडेखोर पळून जावू लागले. यापैकी तीन जण तर पळून गेले. पण एकाला नागरिकांनी पकडला.

मालेगावात गोळीबाराची ही घटना नवी नाहीय. शहरात गुंडाचा हैदोस आणि गोळीबार थांबता थांबेना, असंच दृश्य आहे. काही दिवसांपूर्वी शहरात गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असताना आज पवारवाडी भागात तशीच घटना घडली. एका कारखानदाराकडे असलेली रोकड लुटण्यासाठी गुंडांनी कारखानदारावर हल्ला केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

(मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? दीपक केसरकरांनी अखेर खरं कारण सांगूनच टाकलं)

कारखानदाराला जखमी करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर गुंडांनी हवेत गोळीबार सुरु केला. या गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यामुळे परिसरातील नागरिकांना या घटनेचा सुगावा लागला. काहीतरी विपरीत घडतंय याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर ते तातडीने गोळीबाराचा आवाज आलेल्या दिशेला गेले. परिसरातील स्थानिक नागरीक येत असल्याचं समजल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरुन पळून जावू लागले. विशेष म्हणजे तीन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण एक आरोपी पकडण्यात नागरिकांना यश आलं.

संबंधित गोळीबाराची घटना तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी पकडलेल्या गुंडाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी काही स्फोटकं तर पडलेले नाहीय ना याची शहानिशा केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Gun firing, Malegaon, Malegaon news