नाशिक, 18 मार्च : आज नाशिकमध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी जेव्हा भाजपचा अध्यक्ष झालो तेव्हा फक्त दोनच व्यक्तींना खाली वाकून नमस्कार केला. त्यात एक होते ते म्हणाजे लालकृष्ण आडवाणी आणि दुसरे गोपीनाथ मुंडे तेव्हाच त्यांनी मला विचारलं तुला कोणतं खातं हवं आहे? अशी आठवण यावेळी गडकरी यांनी सांगितली.
काय म्हणाले नितीन गडकरी?
पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहेत. राजकारणात मी ज्यांच्या नेतृत्वात काम केले त्या गोपीनाथ मुंडे यांचा मला अभिमान आहे. मी भाजपचा अध्यक्ष झालो तेव्हा फक्त दोनच व्यक्तींना खाली वाकून नमस्कार केला. त्यात एक होते आडवाणी आणि दुसरे गोपीनाथ मुंडे. मुंडे यांनी मला त्यावेळी विचारले तुला कोणतं खातं पाहिजे. त्यावेळी मला त्यांनी बांधकाम खातं दिलं, आणि त्याच काळात पुणे-मुंबई महामार्गाचं काम झाल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.
भाजपचे काही नेते आज असते तर वेगळं चित्र असतं, पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?
लोकांसाठी जीवाची बाजी लावणारा नेता
पुढे बोलताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचं भाजपसाठी मोठं योगदान आहे. पक्ष मोठा करण्यात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचा सिंहाचा वाटा आहे. गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे 95 ला आमची सत्ता आली. आपल्या लोकांसाठी जीवाची बाजी लावणारा हा नेता होता. त्यांनी ऊसतोड कामगारांना न्याय मिळून दिल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nashik, Nitin gadkari, Pankaja munde