नाशिक, 20 मे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपल्या ठाकरे शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर तज्ज्ञांशी बोलून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळच आली नसती, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं राज ठाकरे यांनी?
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेकडून दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून राज ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. हा धडसोडीचा प्रकार आहे. अशानं सरकार चालणार आहे का? मी त्याचवेळी बोललो होतो, जर तज्ज्ञांना विचारून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली असती तर आज ती बंद करण्याची वेळ आली नसती असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका
पुढे बोलताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. शॉडो कॅबिनेट पुन्हा एकदा कार्यन्वीत करण्यात येईल. नाशिकमध्ये आमची सत्ता असताना जेवढी कामे झाली तेवढी कामं पूर्वी आणि नंतर कधीच झाली नाहीत, असा दावाही यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, MNS, Raj Thackeray