मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नराधमाने चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

नराधमाने चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Nashik: नाशकात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. येथील एका नराधमाने लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत एका महिलेवर बलात्कार (threat to slit throat and raped) केला आहे.

  • Published by:  News18 Desk

नाशिक, 21 डिसेंबर: नाशिक जिल्ह्यातील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. येथील एका नराधमाने लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला ठार मारण्याची धमकी देत (threat to slit throat) एका महिलेवर बलात्कार केला (rape on married woman) आहे. आरोपीनं एकदा नव्हे तर अनेकदा अशाप्रकारे महिलेचं लैंगिक शोषण केलं आहे. अखेर आरोपीच्या अमानुष कृत्याला कंटाळून पीडित महिलेनं सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) करून आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे.

आजाद शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीनं पीडित महिलेला त्र्यंबकेश्वर येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर रात्रभर बलात्कार केला आहे. पीडित महिलेनं नराधमाच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पीडितेच्या छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. अशाच पद्धतीने आरोपीनं पीडित महिलेला विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

हेही वाचा-मित्रानेच केला घात, पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

17 डिसेंबर रोजी पीडित महिलेवर रात्रभर बलात्कार केल्यानंतर आरोपी पीडितेला मित्राच्या घरी घेऊन गेला. याठिकाणी देखील आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत शारीरिक संबंध ठेवले आहेत. अत्याचाराची वासना मिटल्यानंतर आरोपीनं पीडित महिलेला नाशिकमध्ये सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पीडित महिलेनं नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा-फेसबुक फ्रेंडचा नागपुरातील विवाहितेवर बलात्कार; गर्भवती राहताच बदललं मन अन्...

घटनेची गांभीर्यता लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र हलवत नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला ताब्यात घेऊन कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Nashik, Rape