नाशिक, 21 जानेवारी : 'शिवसेना आणि वंचित बहुजन विकास आघाडीचं अजून नातं जमलेलं नाही फक्त एकमेकांवर लाईन मारणे सुरू आहे. कधी पटेल ते आमच्यावर अवलंबून आहे, अशी मिश्किल टोलेबाजी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं.
शिवसेनेने (ठाकरे गट) आमचा पाठिंबा मागितलेला नाही. शिवसेनेसोबत अद्याप आमचे नाते जमलेले नाही आम्ही सध्या फक्त एकमेकांवर लाईन मारतो आहोत. आमची आघाडी संदर्भात अद्याप चर्चा सुरू आहे, आघाडी बाबत अजून चर्चा सुरू आहे. आमच्यावर आहे कधी पटवायचे ते, काँग्रेस की शिवसेना यांपैकी कोणासोबत आघाडी करायचे ते आम्ही ठरवू. उद्धव ठाकरे यासंदर्भात काँग्रेस ,राष्ट्रवादीशी बोलत आहे आमचा दोघांनाही विरोध नाही, असं प्रकाश आंबेडकर मिश्किलपणे म्हणाले.
('शिंदे सरकारचं काउंटडाऊन सुरू', राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा दावा)
ओबीसी आणि गरीब मराठा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेत नको आहे. त्यामुळे त्यांना मी नको आहे. त्यामुळे आघाडीला मुहूर्त लागत नाही. हा वाद माझा नाही तर, काँग्रेस राष्ट्रवादीचा आहे, असंही आंबेडकर म्हणाले.
देशात सध्या हुकूमशाही सुरू आहे. पंतप्रधान आता थेट मनपा निवडणुकीत प्रचाराला येत आहे. पंतप्रधान पदाची पातळी आता ग्रामपंचायत लेव्हलसोबत आली आहे. पंतप्रधानांनी फक्त विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतच आले पाहिजे, परंतु ते आता स्थानिक स्वराज्य संघटना च्या निवडणुकीत ही प्रचाराला येत आहे हे दुर्दैवी आहे. देशात सध्या दंडेलशाही सुरू आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.
(मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेआधी धक्कादायक प्रकार, एकाला अटक)
'नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आम्ही अगोदरच उमेदवार जाहीर केला आहे. धनशक्ती आणि घराणेशहीची ऊब आलेली आहे. त्यामुळे त्या विरहित लोक आम्हाला मदत करतील. नागपूर, लातूर परिस्थिती चांगली आहे. कोकणात मैदानात आहोत मात्र नाशिक मध्ये आम्हाला संधी आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात वंचित आघाडीचे रतन बनसोड हे उमेदवार आहेत. घराणेशाही ,पैसेशाही विरोधात ही लढाई आहे. पेन्शन योजना आणि शिक्षण व्यवस्थेविरुद्ध ही लढाई आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, प्रकाश आंबेडकर, शिवसेना