मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आधी रजेवर गेले, ड्युटीवर हजर होण्याच्या आदल्या दिवशी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

आधी रजेवर गेले, ड्युटीवर हजर होण्याच्या आदल्या दिवशी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

नाशिकमध्ये पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

नाशिकमध्ये पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

कर्तव्यावर हजर होण्याच्या एक दिवस आधीच सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली.

नाशिक, 18 मे : नाशिकमध्ये एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. मसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या शिवराम निकम यांनी गळफास घेत जीवन संपवलं. गेल्या काही दिवसांपासून ते रजेवर होते. ड्युटीवर रुजू होण्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी हे पाऊल उचलले. निकम यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवराम भाऊराव निकम वय 57 हे मसरूळ पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आजारपणामुळे रजा घेतली होती. दरम्यान, कर्तव्यावर हजर होण्याच्या एक दिवस आधीच त्यांनी आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली. निकम यांनी याआधी पोलिस आयुक्तालयातील पंचवटी, सरकारवाडा, शहर वाहतूक तसेच विशेष शाखेत सेवा बजावली होती. काही महिन्यांपासून ते नाशिक शहरातील म्हसरुळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारावर शुद्धीकरण, ग्रामसभेत एकोप्याचं दर्शन; उरुस आयोजक म्हणाले, हे सगळं भीतीदायक 

निकम हे आजारपणामुळे काही दिवसांपासून रजेवर होते. ड्यूटीवर हजर होण्यापूर्वीच त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेमुळे निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या नात्यात मित्रपरिवारात आणि पोलीस दलात शोककळा पसरली आहे. निकम हे अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे होते. शिवराम निकम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निकम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिस तपासात आजारपणामुळे निकम यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात आत्महत्यांच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. अनेक जण मानसिक तणावात येऊन आत्महत्या करत आहेत. अशातच नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निकम यांनी आत्महत्या केली आहे. आजारपणामुळे घेतलेली सुट्टी आणि त्यानंतर ड्युटीवर हजर राहण्याआधी आत्महत्येचं पाऊल निकम यांनी उचलले.

First published:
top videos

    Tags: Police