मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पोलिसांच्या वाहनाने मारल्या तीन पलट्या, तिहेरी वाहन अपघातात घडलं भयानक

पोलिसांच्या वाहनाने मारल्या तीन पलट्या, तिहेरी वाहन अपघातात घडलं भयानक

मुंबई- आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला.

मुंबई- आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला.

मुंबई- आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक, 11 जानेवारी : मुंबई- आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला. नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जातांना ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांच्या वाहनाचा वेग असल्याने वाहनाने तीन पलट्या मारल्या माहिती आहे. तर हा अपघात तिहेरी असल्याची माहिती माहिती समोर आली आहे. यामध्ये तिसरे वाहन अपघात होताच तातडीने पसार झाले आहे.

या घटनेत नाशिक शहर दलाचे 3 पोलीस जखमी झाले आहेत. संतोष भगवान सौंदाणे (वय 57), सचिन परमेश्वर सुक्ले (वय 43), रविंद्र नारायन चौधरी (वय 37) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. दरम्यान जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने अपघाताच्या ठिकाणी दाखल होऊन जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

हे ही वाचा : पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, धमक्या देत हजारोंचा चुनाही लावला, गोंदियातून तोतयाला अटक

औरंगाबादमध्येही भीषण अपघात

औरंगाबाद नगर हायवेवरती ईसारवाडीफाटा येथे आज पहाटेच्या सुमारास जालन्याच्या दिशेने सहलीचे विद्यार्थी घेऊन परतणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सने समोरील ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स मधील तीन ते चार विद्यार्थ्यांसह दोन महिला जखमी झाल्या आहेत.

जालना येथून सहली निमित्त लोणावळ्याला एका खाजगी कोचिंग क्लासेसची सहल गेली होती. या सहलीत विद्यार्थी शिक्षकांसह 26 जणांचा समावेश होता. सहल करून आज पहाटे जालन्याकडे परतताना हा अपघात झाला आहे. जखमींना शासकीय रुग्णालय घाटी येथे रवाना करण्यात आले.

हे ही वाचा : बच्चू कडू यांच्या प्रकृतीबद्दल हॉस्पिटलमधून आली बातमी, कार्यकर्त्यांची एकच गर्दी

मजुरांचा टॅक्टर झाला पलटी

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाच्या कॅनलच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काही महिला व पुरुष काम करत आहेत त्याना घेऊन जाणार ट्रॅक्टर कॅनलमध्ये पलटी झाल्याने दहा मजूर जखमी झाले आहेत. सुदैवाने कॅनल चालू नसल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

First published:

Tags: Accident, Major accident, Nashik, Road accident