Home /News /maharashtra /

मासिक पाळीदरम्यान वृक्षारोपण न करू दिल्याचा विद्यार्थीनीनेच रचला बनाव, चौकशी अहवालात धक्कादायक खुलासा

मासिक पाळीदरम्यान वृक्षारोपण न करू दिल्याचा विद्यार्थीनीनेच रचला बनाव, चौकशी अहवालात धक्कादायक खुलासा

पीडित मुलीनेच हा सर्व बनाव केल्याचं चौकशी अहवालात समोर आलं आहे. बालहक्क संरक्षण आयोग आणि प्रकल्प अधिकारी यांच्या द्विसदस्यीय समितीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे

    नाशिक 02 ऑगस्ट : नाशिकमधून आठवडाभरापूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये विचित्र प्रकार घडला होता. एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिलं नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावला असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, आता या प्रकरणाला धक्कादायक वळण आलं आहे. मासिक पाळी असल्याने तरुणीला वृक्षारोपण करू दिल नाही; शिक्षकाचा अजब तर्क, म्हणाले, अशाने झाडं.. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीनेच हा सर्व बनाव केल्याचं चौकशी अहवालात समोर आलं आहे. बालहक्क संरक्षण आयोग आणि प्रकल्प अधिकारी यांच्या द्विसदस्यीय समितीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, वृक्षरोपणाच्या दिवशी पीडित मुलगी शाळेत गैरहजर असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अहवालात म्हटलं आहे, की शाळेत सतत गैरहजर असल्याने आपलं वर्ष वाया जाण्याची तिला भीती होती. सतत गैरहजर असल्याने वर्गात बसू न देण्याची तंबी शिक्षकाने तिला दिली होती. याच कारणामुळे तिने हा बनाव रचाल असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी अप्पर आयुक्तांकडे सादर केला आहे. मुंबई : न्यूड व्हिडीओ कॉल, वृद्धाला फसवून 3 लाख बळकावले; शेजारीही तोच प्रकार! शिक्षकाने मासिक पाळीमुळे वृक्षारोपण न करू दिल्याची तक्रार या विद्यार्थिनीने थेट आदिवासी आयुक्तांकडे केली होती. आदिवासी संघटनांसह बालहक्क व महिला आयोगानेही तातडीने दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिकच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आणि बालहक्क संरक्षण आयोग सायली पालखेडकर या द्विसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. मात्र, यानंतर आता प्रकरणाला धक्कादायक वळण आलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Nashik, Shocking news

    पुढील बातम्या