मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : पितृपक्षात नाशिक-त्र्यंबकेश्वरला पूजा करण्याचे विशेष महत्त्व का आहे? पाहा VIDEO

Nashik : पितृपक्षात नाशिक-त्र्यंबकेश्वरला पूजा करण्याचे विशेष महत्त्व का आहे? पाहा VIDEO

पितृपक्षात (PitruPaksh) नाशिक-त्रंबकेश्वरला विशेष महत्त्व असतं. शेकडो भाविक या ठिकाणी पूजा करण्यासाठी येत असतात.

नाशिक 12 सप्टेंबर : नाशिक शहर ( Nashik City ) हे धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक शहर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे जगभरातून भाविक या ठिकाणी येत असतात. विविध धार्मिक पुजा या ठिकाणी करत असतात. मात्र, पितृपक्षात (PitruPaksh) नाशिक-त्रंबकेश्वरला विशेष महत्त्व असतं. शेकडो भाविक या ठिकाणी पूजा करण्यासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर त्यामागचं महत्व काय आहे ? पितृपक्ष म्हणजे काय ? थोडक्यात जाणून घेऊयात.   पितृपक्ष म्हणजे काय ?  पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या ऋणातून व्यक्त होण्याचा दिवस आपल्या पूर्वजांमुळे आपल्याला जन्म मिळतो. आपले वडील असतील वडिलांचा जन्म आजोबांमुळे होतो. आजोबांचा जन्म त्यांच्या वडीलांमुळे होतो. त्यामुळे इतर जे मृतात्मे होतात ते पितर बनतात. त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा काळ हा पंधरा दिवसांचा असतो त्याला पितृपक्ष म्हणतात. पुढील पिढ्यांचे कल्याण करण्याची क्षमता ही पित्रांच्या आशीर्वादामध्ये असते. म्हणून इतरांच्या उद्देशाने स्मरण, पूजन दर्पण आणि अन्नदान या प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात, अशी प्रथा आहे. हेही वाचा : Pitru Paksh 2022 : 'या' परिस्थितीत महिलाही करू शकतात पिंडदान, फक्त या नियमांचे करावे लागेल पालन नाशिक-त्र्यंबकेश्वरला पूजा करण्याचे विशेष महत्त्व इथे पितरांचे विशेष कर्म केल्याचे महत्व आहे. कारण दक्षिण वाहणी गोदावरी इथून पुढे जाते. दक्षिण ही पितरांची दिशा आहे. त्यामुळे याच महत्व ब्रम्हांडपुराणात सांगितलं  असल्याचे धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे सांगतात. ते पुढे बोलताना म्हणतात की, इथे केलेलं कर्म हे श्रेष्ठ फळ देत,या पित्रुकर्मात पिंडदान, अन्नदान, गरजूंना मदत केली जाते. त्र्यंबकेश्वरला पितृसंकल्प करावा अस शास्त्रात सांगितल आहे. कारण स्वतः भगवान रामानी दशरथाचे श्राद्ध केल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळे इथे पूजा करण्याचे विशेष महत्व आहे.

दरवर्षी आम्ही नाशिकला विधी करतो

नाशिक हे पवित्र स्थळ आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शामुळे पावन झालेले आहे . त्यामुळे इथे देवदेवतांनी वास्तव्य केल्याने महत्व प्राप्त झाले आहे. पितृपक्षात इथे विधी केला जातो. त्यामुळे आम्ही विधी करण्यासाठी येत असतो, अशी प्रतिक्रिया भाविक ब्रिजेश शर्मा यांनी दिली आहे.
First published:

Tags: Culture and tradition, Lifestyle, Nashik, Pitru paksha

पुढील बातम्या