नाशिक, 31 मार्च : राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांचा फोटो लागल्यानं हा मेळावा चर्चेचा विषय ठरला आहे. शेतकरी मेळाव्याच्या बॅकग्राऊंडला लावण्यात आलेल्या एलईडी वॉलवर दादा भुसे यांचा फोटो झळकल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रोटोकॉलमध्ये दादा भुसे यांचा फोटो पहिल्या स्थानावर होता, त्यामुळे चर्चेला उधाण आलं.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच शेतकरी मेळाव्यात मेळाव्याचे आयोजक माणिकराव कोकाटे यांनी दादा भुसे यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी देखील सरकारच्या कृषीविषयक धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र या मेळाव्यात बॅकग्राऊंडला लावण्यात आलेल्या एलईडी वॉलवर दादा भुसे यांचा फोटो झळकला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रोटोकॉलमध्ये दादा भुसे यांचा फोटो पहिल्या स्थानावर होता, त्यामुळे चर्चेला उधाण आलं.
राष्ट्रवादीची बैठक
दरम्यान दुसरीकडे येत्या 5 एप्रिलला राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे. ही बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षेखाली होणार आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.