मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नायलॉन मांजाने कापला व्यक्तीचा गळा, प्रकृती गंभीर; नाशिकच्या चांदवडमधील प्रकार

नायलॉन मांजाने कापला व्यक्तीचा गळा, प्रकृती गंभीर; नाशिकच्या चांदवडमधील प्रकार

नायलॉन मांजामुळे अनेक जण याआधी जखमी झाले आहेत.

नायलॉन मांजामुळे अनेक जण याआधी जखमी झाले आहेत.

नायलॉन मांजामुळे अनेक जण याआधी जखमी झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Khushalkant Dusane

बब्बू शेख, प्रतिनिधी

नाशिक, 7 डिसेंबर : जानेवारी महिन्यातील संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच पतंग उडवण्याचे तरुण वर्गात वेध लागले आहे. यात प्लास्टिक, सिंथेटिकपासून बनवलेल्या काचेचा थर असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतो. त्यातून अनेकांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एकीकडे नायलॉन मांजा घातक असल्यामुळे त्याच्या विक्रीवर बंदी घातलेली असताना दुसरीकडे मात्र आज ही नायलॉन मांज्याचीं सर्रास विक्री केली जात आहे. याच नायलॉन मांज्यात अडकून अनेक जण जखमी झाले आहे. यातच आणखी एक धक्कादायक घटना चांदवड येथे घडली आहे.

काय आहे संपूर्ण घटना -

नायलॉन मांजामुळे अनेक जण याआधी जखमी झाले आहेत. मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजामुळे एका तरुणाला भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले. मोटारसायकल वरून जात असताना एका व्यक्तीच्या गळ्यात मांजा अडकून त्याचा गळा कापला गेला. राजेश शिंदे असे या व्यक्तीचे नाव आहे.

तसेच त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. या गंभीर झालेल्या व्यक्तीला चांदवडला प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला मालेगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा - अपघातानं कोमात गेलेला तरुण बनला फोन डिरेक्टरी, शेकडो नंबर आहेत पाठ, Video

Aurangabad : पंतग उडवणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज -

औरंगाबाद शहरामध्ये नायलॉन मांजाच्या विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, बंदी असली तरीही मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाची बाजारपेठेत सर्रास विक्री होत आहे. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर शहरातील दोन विक्रेत्यांच्या दुकानात छापा टाकत 22 हजारांचा मांजा जप्त करत नुकतेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्यावर्षी नायलॉन मांजा विक्री झाल्यामुळे अनेक दुचाकी स्वरांचे गळे कापले गेले. यामध्ये तीन ते चार महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. या सोबतच नायलॉन मांजामुळे पक्षी मृत्यू मुखी पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या. आपल्या थोड्याशा आनंदासाठी पक्षांच्या जीवित अशी खेळू नये. नायलॉन व्यतिरिक्त इतर मांजा देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करून पतंग उडवून आपण आपला आनंद साजरा करावा, असं आवाहन पक्षीमित्र डॉ. दिलीप यारदी यांनी केलं आहे.

First published:

Tags: Health, Nashik