नाशिक, २७ ऑक्टोबर : गंगापूर (Nashik Gangapur News) गाव शिवारातील शिवाजीनगर भागात असलेल्या पाझर तलावावर नेहमीच टवाळखोरांचा वावर असतो. याबाबत स्थानिकांनी अनेकदा गंगापूर पोलिसांकडे (Gangapur Police) तक्रारीही केल्या. याकडे गंगापूर पोलिसांकडून नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचं सांगितलं जात आहे. (One killed in clashes between school children in Nashik incident captured on CCTV)
बुधवारी 27 ऑक्टोबर रोजी जुन्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये हाणामारी झाली. मुलांच्या हाणामारीत पाझर तलावात पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांना मिळताच सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.
यावेळी स्थानिक नगरसेवक दिनकर पाटील यांनी पाझर तलाव ब्रिटिशकालीन असून त्याची खोली अधिक असल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच अग्निशमन दलालाही नगरसेवक पाटील यांनी कळविले. अग्निशमन दल व पट्टीचे पोहणाऱ्यांनी हाणामारीत पाण्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
हे ही वाचा-नाशिक: माशांना खायला टाकायला गेली अन्...; शेततळ्यात आढळला मुलीचा मृतदेह
घटनास्थळी पोलिस उपायुक्त दिपाली खन्ना, अमोल तांबे यांनी भेट देत माहिती घेतली. तसेच बांधकम व्यवसायिक विष्णू पाटील यांनी पाझर तलाव परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलांमध्ये हाणामारी झाली असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अल्पवयीन मुलांच्या हाणामारीत बुडलेल्या मुलाचे नाव मुदत्तफिर मेकवाणी असे नाव असून तो अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागीतल रहिवाशी असल्याचे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलांनी सांगितले.
नेमका वाद कशावरून झाला याची माहिती पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलांकडून जाणून घेतली. शिवाजीनगर भागात असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील संबंधित मुलांचा जुना वाद होता. बुधवारी मध्यस्ती करण्यासाठी मित्रांच्या मोबाइलवरून आकाश, सुरज व त्याच्या मित्राला पाझर तलावावर पाण्यात बुडालेला मुदत्तफिर याने बोलावून घेतले. यावेळी मुदत्तफिर याच्या समवेत त्याचे दोन सहकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाशिकमध्ये 27 ऑक्टोबर रोजी जुन्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये हाणामारी झाली. मुलांच्या हाणामारीत पाझर तलावात पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. pic.twitter.com/trFU4EN0wg
— News18Lokmat (@News18lokmat) October 27, 2021
हाणामारीत मुदत्तफिर पाण्यात पडला असता पोहता न आल्याने बुडाला. आकाश नावाच्या मुलाला वाद मिटविण्यासाठी मुदत्तफिर व त्याच्या मित्राने बोलावले. परंतू वाद मिटवताना झालेल्या हाणामारीत मुदत्तफिर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अल्पवयीन मुलांचा नेहमीच पाझर तलाव परिसरात वावर असतो. याकडे गंगापूर पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अशा घटना सतत होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Nashik