नाशिक, 26 मार्च : 'आता जिंकेपर्यंत लढायचं..' असा नवीन नारा उद्धव ठाकरे यांनी मालेगावतील सभेतून दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधल्या मालेगाव येथे मोठी सभा होत आहे. यासाठी ठाकरे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. पक्षाची मोट पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार आहेत. त्यापैकी पहिली सभा कोकणातील खेड येथे झाली. तर दुसरी सभा आज मालेगावात होणार होत. यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
आजच्या या सभेचं काय वर्णन करायचं 15 दिवसांपूर्वी एक खेडला सभा होती, अभुतपूर्व गर्दी होती. आज अथांग गर्दी पसरली आहे. आज आपलं नाव चोरलं धनुष्यबाण चोरलं, नाव चोरलं तरी सुद्धा एवढी गर्दी आहे. ही पूर्वजांची पुण्याई आणि आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आहे. मी स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. तर तुमच्या प्रश्नासाठी लढत आहे. आता जिंकेपर्यंत लढायचं आहे. सुरुवातीलच विचारतो, जिंकेपर्यंत राहणार आहात ना? शिवसैनिकांची एकच घोषणाबाजी हो.
मी त्यावेळी घरात बसून सांगितलं होतं, तरी लोकांनी ऐकलं, मालेगावकरांनी ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद. मुख्यमंत्रिपद येतं आणि जात. लोकांनी भरभरून प्रेम दिलं हे गद्दारांना लाभणार नाही. ही गर्दी भाड्याने आणता येत नाही,
सुहास कांदेंना टोला, कांदा किती खोक्याला विकला गेला.
तुमच्याकडे किती कांदा शेतकरी आहे, कांद्याला भाव मिळाला का? कांदा खरेदी झाली नाही. एका कांद्याची खरेदी झाली. एका खोक्याला एक कांदा गेला. मग तुमच्या कांद्याला किती भाव मिळाला पाहिजे होता. तुमच्या मेहनतीचा पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे.
खुला कारभार आहे, मला कल्पना आहे, 2 लाखांपर्यंत ज्यांच्यावर कर्ज होतं त्यांना लाभ मिळाला की नाही. कोणत्याही अटी शर्थी नव्हत्या. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना सवलत दिली. पण गद्दारी झाली आणि सरकार गेलं. द्राक्ष बागायदार आहे आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज माफ करण्याचा विचार करत होतो. शेतकऱ्यांनी जे पिकवलं, ते विकलं गेलंच पाहिजे. शेतकऱ्यांना हमी नाही हमखास भाव मिळाला पाहिजे.
मला दोन शेतकरी भेटले त्यांची बातमी वाचली, कांदा लागवडीसाठी त्यांनी कर्ज घेतलं, पत्नीचे दागिने विकले. घरात जे शिल्लक होतं, ते विकलं आणि विचार हाच केला होता, पिक हाती आल्यावर नातीचं लग्न करेन. पण कांद्याची विल्हेवाट लागली, अवकाळी पाऊस झाला. कर्ज डोक्यावर चढलं, बायकोचे दागिने अडकले. माझ्या सभेनंतर उत्तर सभा घेणार आहे ना, तर रत्नकाका सारख्या शेतकऱ्यांना उत्तर द्या.
कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने रक्ताने पत्र लिहिले, पण ते पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही. त्यांना फक्त लिहिलेलं भाषण वाचता येतं. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही शेतकऱ्यांचे पूत्र आहात. केंद्रातले धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, त्याविरोधात आवाज उठवा, पण बकरी कधी आवाज उचलते का? कुणापुढे तुम्ही मागणी करताय, ज्यांच्या गळात दोरी बांधून घंटा बांधला आहे.
दिवाळीला बातमी वाचली मुख्यमंत्री रमले शेतीत, हे गेले कसे हेलिकॉप्टरने, यांच्या शेतीत दोन दोन हेलिपॅड आहे. माझा शेतकरी कसा जातो, कधी त्याला साप चावतो, विंचू चावतो. घरची लग्न कार्य अडकले आहे. मुख्यमंत्री शेतात रमले पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाता येत नाही.
सभेपूर्वी ठाकरेंना धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज ठाणे येथे ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी 15 ते 20 महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्यामागचं कारण विचारलं असता या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, “नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना बोलण्याची पद्धत नाही. तिथे सभेत स्टेजवर महिलांच्या लाली-लिपस्टिकचा विषय काढला जातो. तुमचे हात वर असतील तर तंगड्या माझ्याकडे आहेत, अशा भाषेत कोणी बोलत असेल, कोणी आमच्या चारित्र्याला धक्का पोहोचवत असेल तर त्यांच्यासोबत काम करणं आम्हाला शक्य नाही.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Uddhav Thackeray