Home /News /maharashtra /

Nashik: वारंवार पाठपुरावा तरीही प्रश्न सुटेना; अनियमित आणि संथ पाणीपुरवठ्यामुळे नागरिक आक्रमक

Nashik: वारंवार पाठपुरावा तरीही प्रश्न सुटेना; अनियमित आणि संथ पाणीपुरवठ्यामुळे नागरिक आक्रमक

title=

नाशिक (Nashik) मधील पाथर्डी परिसरात नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा विभाग ( Water Supply Department ) अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईला सामोेरे जावं लागतंय.

    नाशिक 01 ऑगस्ट : नाशिक (Nashik) मधील पाथर्डी परिसरात नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा विभाग ( Water Supply Department ) अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईला सामोेरे जावं लागतंय. (Water Problem) परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे नागरिक संतप्त झालेत. यामुळे ठरलेल्या वेळेत पिण्याचे पाणी देखील पुरेसे मिळत नाहीये. काही भागात थोडा का होईना पाणीपुरवठा होतोय. मात्र, काही भागात पाणीच मिळत नाहीये. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. नागरिकांनी यासंदर्भात वेळोवेळी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. पण कोणताही ठोस पर्याय यावर काढला जात नाही. एकीकडे चांगला पाऊस झालाय आणि होतोय. तर दुसरीकडे मात्र पाणीटंचाई झाली आहे. अनेकदा निवेदन देऊनही काहीच होत नाहीये. त्यामुळे आता थेट पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. हेही वाचा - Nashik : महिलांचा अनोखा प्रयोग; शेळीच्या दुधापासून बनवला आरोग्यवर्धक साबण पाठपुरावा करूनही दुर्लक्ष पाथर्डी परिसरातील वासन नगर, ज्ञानेश्वर नगर, समर्थ नगर, जायभाये नगर, सराफ नगर, अंजना लॉन्स भाग, दामोदर नगर आणि नरहरी नगर या परिसरात सातत्याने कमी जास्त दाबाने पाणीपुरवठा होतोय. कधी 2-3 दिवस पाण्याचे वांधे असतात. नागरिकांचा हा पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासूनचा आहे. मात्र, याकडे पाणीपुरवठा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. "कमी दाबाने पाणी येत असल्याचं आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलंय. सर्वच भागात एकाच वेळी पाणीपुरवठा न करता वेळ ठरवून विभागून पाणीपुरवठा करायला हवा. तसेच एकाचं लाईनवर जास्त लोड देऊ नये या सर्व बाबींचा विचार केला तर हा प्रश्न तात्काळ मार्गी लागेल. एकाचवेळी सर्वत्र पाणीपुरवठा करत असल्यामुळे काही भागात पाणी कमी दाबाने जाते. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. हे सर्व वारंवार सांगूनही अधिकारी लक्ष देत नाहीत", अशी माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाठ यांनी दिली आहे. "ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला झगडावं लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. तात्काळ हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही", अशी माहिती स्थानिक नागरिक मयुर टरले यांनी दिली आहे. हेही वाचा - Mumbai : स्पर्धा आणि वाढती महागाई; खानावळ व्यावसायिकांना दुहेरी 'झटका', पाहा VIDEO परिसरात इमारतींची संख्या वाढल्याने येतोय अडथळा "या परिसरात इमारतींची संख्या वाढली आहे. उंच इमारती झाल्या आहेत. त्यामुळे वरच्या फ्लॅटवर कमी दाबाने पाणी पोहचत आहे. मात्र, आम्ही परिसराची पाहणी करून ज्या ठिकाणी पाण्याच्या समस्या निर्माण होत आहे. ती समस्या सोडवण्याचा तात्काळ प्रयत्न करू", अशी माहिती पाणीपुरवठा विभाग शाखा अभियंता गोकुळ पगारे यांनी दिली आहे.
    First published:

    Tags: Nashik, Water crisis

    पुढील बातम्या