मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आता सुईविना कोरोनाची लस ! नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड

आता सुईविना कोरोनाची लस ! नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड

Image_Zydus Cadila / File

Image_Zydus Cadila / File

Needle Free Covid vaccine: नीडल फ्री लसीकरणासाठी महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

नाशिक, 8 डिसेंबर : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Omicron variant of Coronavirus) चिंता वाढलेली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आरोग्य विभागाकडून नीडल फ्री लसीकरणाचा (Needle free vaccination) उपक्रम हाती घेण्यात येत आहे. नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक (Nashik) आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. (Needle free covid vaccine in Nashik and Jalgaon of Maharashtra)

झायकोव्ह डी लशीचे तीन डोस

लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून नीडल फ्री लसीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमात 'झायकोव -डी' (Zycov-D) ही निडल फ्री लस दिली जाणार आहे. जळगाव आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आठ लाख डोस मिळणार आहेत. झायकोव्ह डी लशीचे 28 दिवसांच्या अंतराने तीन डोस देणार आहेत.

दुसरा डोस घेण्याबाबत निरुत्साह

लसीकरणाला देशभरात वेगात सुरुवात झाली. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, त्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या डोस घेण्याबाबतच्या निरुत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून लसीकरणासाठी जनजागृती करुन लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

वाचा : Omicron वर औषध सापडलं; GSK-Vir च्या शास्त्रज्ञांनी दिली Good news

झायडस कॅडिला कंपनीची झायकोव्ह डी ही लस नीडल फ्री देण्यात येणार आहे. म्हणजेच सुईविना लस आता नागरिकांना दिली जाणार आहे. ज्या नागरिकांना सुईने लस घेण्यासाठी भीती वाटते अशा नागरिकांसाठी ही लस वरदान ठरणार आहे.

पुढील काही दिवसांत या लसीचं वितरण नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस आणि त्यानंतर तिसरा डोस 56 दिवसांनी तिसरा डोस घ्यायचा आहे. नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. त्यानंतर येथील प्रतिसाद पाहून राज्यातील इतर भागात नीडल फ्री लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत किती घातक आहे Omicron?

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron) वाढत्या दहशतीदरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर येत आहेत. अमेरिकेचे सर्वोच्च शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी म्हटलं आहे की, कोरोनाव्हायरसचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत जास्त गंभीर नाही. डॉ फाउची यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. तत्पूर्वी, त्यांनी दुसर्‍या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असंही सांगितलं होतं की ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे परंतु सुरुवातीचे संकेत सूचित करतात की तो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी प्राणघातक आहे.

भारतासह जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे की जरी ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी तो फारसा घातक नाही. जगातील कोणत्याही देशात या व्हेरिएंटमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी रविवारी सीएनएनच्या स्टेट ऑफ द युनियन कार्यक्रमात सांगितलं की, ओमिक्रॉनच्या गांभीर्याबद्दल निष्कर्ष काढण्यापूर्वी वैज्ञानिकांना अधिक माहिती गोळा करणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Nashik