लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 21 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे त्यांच्या बोलण्याच्या शैलीसाठी आणि साध्या राहणीमानामुळे ओळखले जातात. नुकताच त्यांनी परदेश दौरा केला तेव्हा मराठमोळ्या पेहरावाची चर्चा झाली होती. आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स करताना दिसत आहेत. एका लग्नसोहळ्यावेळी त्यांनी डान्स केला.
नरहरी झिरवाळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी संभळ या पारंपरिक नृत्यावर ठेका धरला आहे.
एका लग्न सोहळ्यात बायकोला खांद्यावर घेऊन विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांचा डान्स, Video Viral pic.twitter.com/6Cy7TbwHUw
— News18Lokmat (@News18lokmat) May 21, 2023
नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यात वनारे हे त्यांचे गाव असून ते आदिवासी बहुल भागात आहे.
गेल्या महिन्यात नरहरी झिरवळ हे पत्नीसह जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी, पायात चपला अशा पेहरावात ते होते. तर पत्नी नऊवारी लुगडं, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत घालून होत्या. झिरवळ दाम्पत्याचे जपानमधल्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP