मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की बाहेरच्या? एकनाथ खडेसेंचे वादग्रस्त वक्तव्य, मुलाबद्दलही बोलले

साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की बाहेरच्या? एकनाथ खडेसेंचे वादग्रस्त वक्तव्य, मुलाबद्दलही बोलले

एकनाथ खडसे यांना सर्व पदे ही घरातच पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नंदुरबार येथे केली होती.

एकनाथ खडसे यांना सर्व पदे ही घरातच पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नंदुरबार येथे केली होती.

एकनाथ खडसे यांना सर्व पदे ही घरातच पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नंदुरबार येथे केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Khushalkant Dusane

नितीन नांदुरकर, प्रतिनिधी

जळगाव, 16 नोव्हेंबर : जळगावात मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांना परिचित आहे. त्यातच आता एकनाथ खडसेंनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं - 

गिरीश महाजन साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की बाहेरच्या? असा सवाल करत दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही. नाहीतर कदाचित तो पण राजकारणात आला असता, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. गिरीश महाजन यांनी नंदुरबार येथे एकनाथ खडसे यांना सर्व पदे घरात पाहिजेत, अशी टीका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देतांना एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर निशाणा साधणा साधला. गिरीश महाजनांच्या आरोपाला प्रत्युत्तर देतांना एकनाथ खडसेंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

एकनाथ खडसे यांना सर्व पदे ही घरातच पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नंदुरबार येथे केली होती. दरम्यान, गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेच्या अध्यक्ष या पदावर कायम का आहेत? साधना महाजन तुमच्या कुटुंबातल्या की बाहेरच्या आहेत? दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही नाहीतर कदाचित मुलगा राजकारणात आला असता, असे वादग्रस्त विधान करत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा - 'उर्मटपणा म्हणजे नेतृत्त्व नाही', सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

भाजपमध्ये घराणेशाही असलेल्यांची संख्या मोठी आहे. नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हेदेखील घराणेशाही मधून आले असून त्यांना हा नियम लागू नाही का? त्यामुळे एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत, याचा विचार गिरीश महाजन यांनी करावा, असा टोलाही एकनाथ खडसेंनी लगावला आहे. मात्र, या आरोप प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा खडसे-महाजनांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Eknath khadse, Girish mahajan, Jalgaon, Politics