मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशकात हत्येचं सत्र सुरुच, किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

नाशकात हत्येचं सत्र सुरुच, किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

नाशिक हादरले ! तरुणाची निर्घृण हत्या, मरेपर्यंत डोक्यात दगड घालून ठेचले

नाशिक हादरले ! तरुणाची निर्घृण हत्या, मरेपर्यंत डोक्यात दगड घालून ठेचले

youth killed by smashing head with stone: नाशकात डोक्यात दगड घालून एका तरुणाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • Published by:  Sunil Desale

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 24 नोव्हेंबर : नाशकात (nashik) गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या (youth killed by smashing head with stone) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. नाशिकमधील म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ (Mhasrul RTO office Nashik) ही हत्या झाली आहे.

मरेपर्यंत दगडाने ठेचलं

म्हसरूळ आरटीओ ऑफिस जवळ तरुणाची हत्या करण्यात आली आहे. राजू शिंदे अस मयत तरुणाचे नाव आहे. जोपर्यंत मयत होत नाही तोपर्यंत आरोपीने दगडाने डोके ठेचले आणि निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण नाशकात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हत्येचं कारण काय?

मयत राजू शिंदे याचे भाजीपाल्याचे छोटे दुकान आहे. दुकानाच्या वर्चस्ववादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. विविध अँगलेने पोलीस आपला तपास करत आहेत. दरम्यान या हत्याकांडांनंतर शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

वाचा : नवी मुंबईत खंडणीसाठी दहशत, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अन्नू आंग्रेसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

आरपीआय महिला पदाधिकारीची चाकू खोपसून हत्या

ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार (knife attack) करुन हत्या केल्याची घटना नाशकात समोर आली होती. मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकर (Pooja Ambekar) असं होतं. पूजा आंबेकर ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. 3 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा आंबेकर या आरपीआयच्या पदाधिकारी होत्या. रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल 20 ते 25 वार केले. सोबत राहणाऱ्या इसमानेच हत्या केली असल्याचा संशय आहे.

संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंगापूर पोलीस या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वाचा : नांदेडात पोटच्या लेकानं जन्मदात्याला दिला भयावह मृत्यू

बिअर पाजली अन् नंतर वाहिला रक्ताचा पाट

नाशिक जिल्ह्यातील म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अट्टल गुन्हेगाराची हत्या करण्यात आला आहे. जामिनावर आलेल्या या गुन्हेगाराचा पार्टीच्या बहाण्याने बोलावून धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण गणपत काकड असं खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. मयत प्रवीणची काही दिवसांपूर्वीच जामिनावर मुक्तता झाली होती. प्रवीण हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल होते.

First published:

Tags: Crime, Murder, Nashik