मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik: चुकून एक्सलेटर वाढवला अन् तरुणी स्कूटीसह थेट एटीएममध्ये शिरली, LIVE VIDEO

Nashik: चुकून एक्सलेटर वाढवला अन् तरुणी स्कूटीसह थेट एटीएममध्ये शिरली, LIVE VIDEO

चुकून एक्सलेटर वाढवला अन् स्कूटीसह तरुणी ATM मध्येच शिरली, नाशकातील घटनेचा LIVE VIDEO

चुकून एक्सलेटर वाढवला अन् स्कूटीसह तरुणी ATM मध्येच शिरली, नाशकातील घटनेचा LIVE VIDEO

Nashik News: स्कूटीवर बसलेल्या तरुणीने चुकून एक्सलेटर वाढवला आणि ती थेट एटीएमची काच फोडून आत शिरल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

  • Published by:  Sunil Desale
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 4 जून : स्कूटी चालकांकडून चुकून एक्सलेटर वाढवल्याने अपघात झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. असाच एक प्रकार आता नाशिक (Nashik)मधून समोर आला आहे. स्कूटीवर बसलेल्या एका तरुणीने चुकून एक्सलेटर वाढवला आणि मग ती स्कूटीसह थेट समोरील एटीएममध्येच शिरली (young girl enter in ATM with scotty). ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद (Incident caught in CCTV) झाली आहे. नाशिकमधील सावता नगर परिसरात ही घटना घडली आहे. एका एटीएम सेंटरसमोर एक तरुणी स्कूटीवर बसली होती. त्याच दरम्यान चुकून तरुणीकडून गाडीचा एक्सलेटर वाढला. एक्सलेटर जोरात दिल्याने गाडीने लगेचच वेग पकडला. स्कूटी इतकी जोरात होती की, समोर असलेल्या एटीएमची काच फोडून तरुणी स्कूटीसह एटीएमच्या आत शिरली. या घटनेत सुदैवाने मोठी हानी झालेली नाहीये. मात्र, एटीएम आणि गाडीचे नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. एटीएममध्ये गाडी शिरल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि तात्काळ पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. भिवंडीतही घडला होता असाच प्रकार ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत गेल्यावर्षी असाच प्रकार घडला होता. भिवंडीमध्ये एका पठ्ठ्याने पहिला गिअर टाकला आणि दुचाकी थेट दुकानातच घेऊन पोहोचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथील पटेल नगर इथंही गंमतीशीर घटना घडली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. या घटनेचा थरार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला. वाचा : नाशिकमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पटेल नगर येथे हर्षित डिजिटल फोटो स्टुडिओ असून त्या दुकानातील कामगार दुकानाच्या काऊंटरवर उभा होता. तर दुकानासमोर एक तरुण दुचाकीवर बसून होता, तो बाईक सुरू करून जाण्याच्या तयारीत होता. पण, या तरुणाने बाईक गिअरमध्ये असताना सुरू केली असता ती लगेच सुरू झाली आणि तिचा वेग अधिक असल्याने त्याने ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक्सलेटर जोरात फिरविले. मग, बाईकवरील या तरुणाचे नियंत्रण सुटले आणि या तरुणासह बाईक थेट फोटो स्टुडिओत शिरली. यामध्ये दुकानातील डिजिटल फ्लॅश व इतर साहित्याचे नुकसान झाले.
First published:

Tags: Cctv, Nashik, Shocking viral video

पुढील बातम्या