मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik News: शिकाऊ ग्रामसेवकच निघाला सोनसाखळी चोर, सुट्टीच्या दिवशी करायचा Chain Snatching

Nashik News: शिकाऊ ग्रामसेवकच निघाला सोनसाखळी चोर, सुट्टीच्या दिवशी करायचा Chain Snatching

शिकाऊ ग्रामसेवकच निघाला सोनसाखळी चोर, सुट्टीच्या दिवशी करायचा चोरी

शिकाऊ ग्रामसेवकच निघाला सोनसाखळी चोर, सुट्टीच्या दिवशी करायचा चोरी

Nashik trainee gram sevak arrest: सोनसाखळी चोरी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा एक शिकाऊ ग्राम सेवक असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 18 डिसेंबर : नाशिक पोलिसांनी (Nashik Police) केलेल्या एका कारवाईत चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आल्यावर त्याची चौकशी केली असता तो शिकाऊ ग्रामसेवक (Trainee gram sevak) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस मित्राने दिलेल्या माहितीवरून गंगापूर पोलिसांनी या चोरट्याला अटक केली. (Nashik Police arrest trainee gram sevak in chain snatching case)

लाखो रुपयांचे सोने जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपकडून पोलिसांनी सुमारे 5 लाखांचे 11 तोळे सोने व दुचाकी जप्त केलीय. विपूल रमेश पाटील असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. विपूल पाटील याने कोरोनाकाळात 14 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारला होता असा अंदाज पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आलं आहे.

वाचा : पहाटे 4 पर्यंत गार्डसोबत गप्पा अन् अचानक स्वदिच्छा गायब, 20 दिवस उलटले पण...

रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी करायचा चोरी

विपूल हा चांदवडमध्ये शिकाऊ ग्रामसेवक म्हणून नोकरी करतो. अमृतधाम भागात राहणारा विपूल रविवारी आणि सुटीच्या दिवशी नाशिक शहरात महिल्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकवून लंपास करायचा. शिकाऊ ग्रामसेवक सोनसाखळी चोरी करत असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. त्याने गंगापूर पोलीस हद्दीत पाच सोनसाखळी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याने अजून कुठे चोरी केली याचा तपास आता पोलीस करत आहेत.

असा आला पोलिसांच्या जाळ्यात

सोनसाखळी चोरीप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. संशयित चोरट्याच्या वर्णनाची माहिती पोलीस मित्रांना दिली होती. या वर्णनानुसार दिसणारा संशयित व्यक्ती गंगापूर पोलीस हद्दीत फिरताना दिसून आला. शिवाय, त्याच्याकडे असलेल्या बाईकला नंबरप्लेटही नव्हती. पोलीस मित्राने ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि संशयिताला गंगापूररोड वरील आकाशवाणी टॉवर परिसरात अटक केली.

वाचा : हुंडा न घेतल्याने गाजलेला इन्स्पेक्टर लाच घेताना अटक, दार तोडून फिल्मी स्टाईल कारवाई

चोरीसाठी घेतली रजा; औरंगाबादेतील तरुणाने 6 लाखांवर मारला डल्ला

बीड शहरातील एका ऑटोमोबाईल्सच्या दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी मध्यरात्री दुकान फोडून 6 लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत या गुन्ह्याच्या छडा लावला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून तो एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपीनं चोरी करण्यासाठी कंपनीत रजा घेतली होती. रजा घेतल्यानंतर आरोपी औरंगाबादहून बीडमध्ये पोहोचला होता. याठिकाणी आरोपीनं आपल्या काही मित्रांच्या मदतीने ऑटोमोबाइल्सच्या दुकानावर डल्ला मारला होता. भामट्यांनी दुकानाची ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट लंपास केले होते.

First published:

Tags: Cctv, Nashik, Theft