नाशिक, 07 जुलै : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या शिंदे गावात भोंदुगिरीतून एका महिलेवर धारदार चाकूने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक रोड परिसरातील शिंदे गावात ही घटना घडली, जनाबाई बर्डे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर निकेश पवार असं आरोपीचं नाव आहे. ही महिला मजुरीचं काम करायची. या महिलेच्या अंगात देव येत असल्याने अनेक लोक तिच्याकडे समस्या घेऊन जायचे. त्या समस्येचे ते निराकरण करायचे. याच गावात राहणार आरोपी निकेश पवार हा देखील त्याची वैयक्तिक समस्या घेऊन तिच्याकडे वर्षभरापासून जात होता. मृत महिलेनं सांगितलेले उपाय तो करायचा मात्र त्याला सांगितलेल्या उपायातून एकही लाभ मिळाला नाही. त्याच्या समस्येचे निराकरण झाले नाही. उलट त्याच्या आयुष्यात समस्या जास्त तयार झाल्याने तो नैराश्यात गेला. यातून त्याने जनाबाई बर्डे यांचा धारदार शास्त्राने वार करत खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. संशयित निकेश पवार याला नाशिक रोड पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







