नाशिक 9 डिसेंबर : नाशिक शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामध्ये घरफोडीचं प्रमाण जास्त आहे. पोलिसांना चुकवण्यासाठी चोरटे नवे-नवे फंडे वापरुन चोरी करत आहेत. त्यांच्या या उद्योगामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय. पण, चोर कितीही हुशार असला तरी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच. नाशिकमध्येही अशाच एका चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
रिझवान शहा असं मुंबई नाका पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपीचं नाव आहे. रिझवान हा पोलिसांना आपल्या उंची राहणीमाणाच्या जोरावर हुलकावणी देत होता.सुटाबुटात राहणारा रिझवान बंद घर हेरून कटावणीच्या साह्याने घराच्या दाराचे लाॅक ताेडून चाेरी करून जाताना घराचा दरवाजा आणि ताेडलेले लाॅकही बराेबर घेऊन जात असे. त्यामुळे पोलीस ही चक्रावत. त्यांच्या तपासात अडथळे निर्माण होत असतं.
अखेर, रेणुकानगर येथील घरफोडीच्या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्यक्तीची गेट नालिसीस प्रणालीच्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली, आणि रिझवान अलगत जाळ्यात सापडला. त्याच्याकडून 13 तोळे सोन्याचे दागिने पोलिसाींनी हस्तगत केले आहेत. शहरातील इतर ठिकाणी झालेल्या घरफोडीची माहितीही त्यानं दिली. मुंबई नाका पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.
'आई-बाबा घरी नाहीत, तू ये..'; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् तरुणासोबत भयानक घडलं
महत्त्वाची सूचना
नागरिकांनी देखील आपल्या घराची,वस्तूंची काळजी घेण्याची गरज आहे.कोणावर हि तात्काळ विश्वास टाकू नका,अगोदर त्या व्यक्तीची शाहनिशा करा,त्यानंतरच त्याला माहिती द्या,काही चोरटे माहिती काढून रात्रीच्या वेळी चोरी करतात.त्यामुळे सतर्क रहा असे अवाहन नाशिक गुन्हे शाखा विभागाने केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Local18, Nashik