मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कांद्याला फक्त सव्वा रुपयाचा भाव, 8 हजारांचा तोटा; नाशिकमधील धक्कादायक घटना

कांद्याला फक्त सव्वा रुपयाचा भाव, 8 हजारांचा तोटा; नाशिकमधील धक्कादायक घटना

5 क्विंटल 10 किलो कांद्याला मिळाले 500 रुपये, गाडी भाडंही गेलं अन् हाती उरले....

5 क्विंटल 10 किलो कांद्याला मिळाले 500 रुपये, गाडी भाडंही गेलं अन् हाती उरले....

5 क्विंटल 10 किलो कांद्याला मिळाले 500 रुपये, गाडी भाडंही गेलं अन् हाती उरले....

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक : आधीच अवकाळी पाऊस आणि कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. जेवाढा पैसा कांदा लावताना घातला तेवढाही उत्पादनानंतर निघत नसल्याने बळीराजा पूर्ण हताश झाला आहे. त्यात एकाचवेळी गुजरात, महाराष्ट्रासह इतर ठिकाणचे कांदे तयार झाल्याने आवाक वाढली आणि भाव घसरले आहेत.

काही बाजार समित्यांमध्ये तर चक्क सगळा खर्च जाऊ शेतकऱ्याच्या हातात अवघे 2 रुपये आले. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनाच आपल्या पदरचे पैसे घालावे लागले आहेत. कांदा विकूनही त्यांना चांगला भाव मिळत नसल्याने जगायचं कसं, खायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सटाण्यातून पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे.

कांदा विकायला गेलेल्या शेतकऱ्याला भरावे लागले 131 रुपये, नेमका काय प्रकार

सटाणा बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिकिलोमागे सव्वा रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे वाहन आणि इतर खर्चासाठी शेतकऱ्यावर आपल्याच खिशातून पैसे काढून देण्याची वेळ आली आहे.

ब्राह्मणगाव इथे राहणाऱ्या सुभाष पंढरीनाथ अहिरे यांनी शुक्रवारी कांदा विक्रीसाठी सटाणा बाजारपेठेत आणला. कांद्याला बरा भाव मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. व्यापाऱ्याने सव्वा रुपये किलो अशी बोली लावून कांदा खरेदी केला. सगळा खर्च जाऊन त्यांना 569 रुपये हाती आली. त्यांना गाडी भाडं आणि इतर गोष्टींचा खर्च हा आपल्या खिशातून द्यावा लागला.

Onion Subsidy : सरकारी अनुदान म्हणजे थट्टा, शेतकऱ्यानं समजावलं कांद्याचं गणित, पाहा Video

यंदा कांदा चांगला होईल आणि त्याला भाव मिळेल याची आस लावून 5 गुंठ्यावर लागवड केली. त्यांना काढणीसाठी 8 हजार रुपये खर्च आला. गाडीत भरून बाजार समितीमध्ये आणण्यासाठी 900 रुपये खर्च आला.

कांदा विकून त्यांना 569 रुपये मिळाले. अहिरे यांना 8330 रुपयांचा तोटाच झाला. जगायचं कसं खायचं काय आणि कांदा उत्पादनासाठी टाकलेले पैसेही परत न आल्याने अहिरे हताश झाले. मात्र 569 रुपये घेऊन घरी जाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. निराश होईन ते बाजार समितीमधून पुन्हा घरी आले.

First published:
top videos

    Tags: Farmer, Nashik, Onion