मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Facebook live दरम्यान आक्षेपार्ह शब्द, नाशकात आपचे नेते जितेंद्र भावे यांना अटक

Facebook live दरम्यान आक्षेपार्ह शब्द, नाशकात आपचे नेते जितेंद्र भावे यांना अटक

नाशिकमधून (Nashik News ) एक बातमी समोर येतेय. आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांना अटक केली आहे.

नाशिकमधून (Nashik News ) एक बातमी समोर येतेय. आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांना अटक केली आहे.

नाशिकमधून (Nashik News ) एक बातमी समोर येतेय. आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांना अटक केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नाशिक, 24 डिसेंबर: नाशिकमधून (Nashik News ) एक बातमी समोर येतेय. आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांना अटक केली आहे. महिला शिक्षण अधिकाऱ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.

जितेंद्र भावे यांनी एका फेसबुक लाईव्ह केलं होतं. या फेसबुक लाईव्हच्या वेळी त्यांनी मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह शिक्षण विभागावर ताशेरे ओढले होते. तसंच सुनीता धनगर यांचा एकेरी उल्लेख करत त्या भ्रष्टाचारी असल्याचंही म्हटलं होतं. याव्यतिरिक्त लाईव्ह दरम्यान त्यांनी मनपा शिक्षणाधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील खडेबोल सुनावले होते.

हेही वाचा- Virat Captainship Controversy: संजय मांजरेकरनं घेतली विराटची बाजू, गांगुलीबद्दल म्हणाला...

जितेंद्र भावे यांनी फेसबुक लाईव्हवेळी बोलताना 'काम जमत नसेल, तर घरी बसून धुणी भांडी करावीत', असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात सध्या पेपरफुटी प्रकरण चर्चेत आहे. तसंच पेपरफुटीप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. म्हाडा, टीईटी, आरोग्य भरती परीक्षा, एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटीची प्रकरणं देखील समोर आली. या पार्श्वभूमीवर जितेंद्र भावे यांनी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं.

त्याच फेसबुक लाईव्हदरम्यान त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली होती. याप्रकरणी जितेंद्र भावेंसह त्यांच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.

आपचे प्रवक्ते जितेंद्र भावे

जितेंद्र भावे हे नाशिकचे आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आहेत. यापूर्वी भावे यांनी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केलं होतं. त्यावेळी ते चर्चेत आले होते. रुग्णालयात बिलाच्या मुद्द्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि जितेंद्र भावे यांनी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी अंगावरील कपडे काढून आंदोलन केलं होतं

First published:

Tags: Nashik