मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik Murder : पोटच्या गोळ्यासारखं जपलेल्या आजीचा नातवाने हातातील कड डोक्यात घालून केला खून

Nashik Murder : पोटच्या गोळ्यासारखं जपलेल्या आजीचा नातवाने हातातील कड डोक्यात घालून केला खून

नाशिक जिल्ह्यातील हरसूलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क नातवाने आजीचा किरकोळ कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील हरसूलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क नातवाने आजीचा किरकोळ कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील हरसूलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क नातवाने आजीचा किरकोळ कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नाशिक, 24 ऑगस्ट : नाशिक जिल्ह्यातील हरसूलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क नातवाने आजीचा किरकोळ कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. (Nashik Murder) नातवाने मद्यप्राशन करून आल्यानंतर जेवायला दिले नाही म्हणून नातू दशरथ किसन गुरव (22) याने मारहाण केल्याने आजी गंगूबाई रामा गुरव (७०) यांचा मृत्यू झाला. त्या अर्धांगवायूने ग्रस्त होत्या. मोलमजुरी करून त्यांनी मुलांसह नातवाला वाढविले होते.

नातवाने हातातील कड्याचा जोरदार फटका आजीच्या उजव्या डोळ्याजवळ मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील हरसूलमध्ये हा प्रकार घडला. दरम्यान पोलिसांनी आरोपी नातून दशहथ ताब्यात घेतले आहे. याचबरोबर हरसूल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. काम धंदा करत नाही, बसून खातो या आजीच्या बोलण्याचा राग आल्याने नातवाने केलेल्या मारहाणीत 70 वर्षीय आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा : विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू, वाचा नेमकं काय घडलं

मंगळवारी सकाळी ही धक्कदायक घटना घडली. शुल्लक कारणावरुन आजी आणि नातवात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून नातवाने आजीला मारहाण केली. यात आजीच्या उजव्या डोळ्या जवळ गंभीर जखमी झाली आणि जागीच गंगाबाई गुरव यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून गंगूबाई गुरव यांचा मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

घटनाक्रम असा

अत्यंत शुल्लक कारणावरुन आजी आणि नातवात भांडण झाले होते. या भांडणाचा राग नातवाच्या डोक्यात केला. त्याने संतापाच्या भरात आजीवर हातातील कड्यानेच वार केला. यात आजीच्या उजव्या डोळ्या जवळ गंभीर जखमी झाली. नातवाने हातात घातलेलं हे कडं लोखंडी होते. त्यामुळे त्याने घातलेला घाव एवढा जबर होता कि आजीचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : Beed Student : धक्कादायक! एचआयव्ही बाधित विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलल्याचा आरोप, पालकमंत्र्याकडे तक्रार

नातवाच्या जीवघेण्या घावाने आजी गंभीर जखमी झाली. जागीच गंगाबाई गुरव यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तातडीने या घटनेबाबत कळताच घटनास्थळ गाठलं आणि गंगूबाई गुरव यांचा मृतदेह पुढील पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवला.

First published:

Tags: Crime news, Murder, Murder news, Nashik