मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik MLC Election : नाशिकमधून मोठी अपडेट समोर, शुभांगी पाटलांना तांबेंचा धक्का!

Nashik MLC Election : नाशिकमधून मोठी अपडेट समोर, शुभांगी पाटलांना तांबेंचा धक्का!

सत्यजित तांबे, शुभांगी पाटील

सत्यजित तांबे, शुभांगी पाटील

नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली आहे. सध्या दुसऱ्या फेरीसाठी मतमोजणी सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक,  2 फेब्रुवारी :  नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देिला. महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. मात्र निवडणुकीपूर्वी भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचं समर्थन केल्यानं निवडणुकीमध्ये मोठी चूरस निर्माण झाली होती. आज या जागेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्याच फेरीत सत्यजित तांबे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

सत्यजित तांबे आघाडीवर 

सत्यजित तांबे यांनी पहल्या फेरीत आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत एकूण 28 हजार मतांची मोजणी झाली. त्यापैकी सत्यजित तांबे यांना एकूण 15784 मत पडली. तर शुभांगी पाटील यांना 7872 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. तर 2 हजार 741 मत बाद झाली आहेत. पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांनी जवळपास आठ हजारांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीत देखील सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत.

हेही वाचा: Nagpur MLC Election : भाजपच्या बालेकिल्ल्याला मविआचा हादरा; नागपुरातून सुधाकर आडबाले विजयी

कोकणात मविआला धक्का

दरम्यान कोकणामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. तर नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. औरंगाबादमधून राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत.

First published:

Tags: Nashik