Home /News /maharashtra /

Nashik : नाशिक मासिक पाळी प्रकरण पीडित मुलगी करणार राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार

Nashik : नाशिक मासिक पाळी प्रकरण पीडित मुलगी करणार राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार

एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिले नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क काढला होता.

  नाशिक, 03 ऑगस्ट : नाशिकमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये विचित्र प्रकार घडला होता. एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिले नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावला असल्याची बातमी समोर आली होती. यावर त्या मुलीकडून आवाज उठवण्यात येणार आहे.

  नाशिकमधील पीडित मुलगी राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. मासिक पाळीमुळे शिक्षकाने शाळेत वृक्षरोपण करू दिले नाही पीडित मुलीने केला होता आरोप या आरोपानंतर त्या शिक्षकांकडून खंडण करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील देवगाव आदिवासी आश्रम शाळेत हा प्रकार घडला होता. याच आरोपाची चौकशी केल्यानंतर आदीवासी विभागाने शिक्षकाला क्लिनचीट दिले होते. सदर मुलगी त्या दिवशी शाळेत हजरच नव्हती असे रिपोर्ट मध्ये नमूद करत शिक्षकाला क्लिनचीट दिली होती.

  हे ही वाचा : महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, चेक करा नवे दर

  याच निर्णयाविरोधात सदर मुलगी आणि काही सामाजिक संघटना आज राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. दरम्यान या प्रकरणाने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

  नेमकं काय आहे प्रकरण

  एकीकडे देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी महिलेला बसवलं जातं असल तरी दुसरीकडे आदिवासी भागातील तरुणी महिलांवरील अत्याचार कमी व्हायचं नाव घेत नाहीये. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये घडला आहे. एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिलं नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावत या युतीवर हा अन्याय केला आहे.

  हे ही वाचा : उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह 6 जणांना अटक

  आपला देश आधुनिक विचारांवर चालणारा समजला जातो. विशेषकरुन महाराष्ट्र तर पुरोगामी विचारांचा आहे. इथं संतापासून समाजसेवकांनी प्रबोधनातून महाराष्ट्र घडवला आहे. अशा या महाराष्ट्रात अशी घटना घडल्याने सर्वच थरातून निशेष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या ज्ञान मंदिरात भेदभाव दूर करायला हवा. तिथेच अशी गोष्ट घडत असेल तर येणारी पिढी कशी असेल? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, याप्रकरणी सदर तरुणीने तक्रार केली असून प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Nashik, School student, School teacher

  पुढील बातम्या