Home /News /maharashtra /

Nashik : 'फुल हे गुलाब का..' आश्रम शाळेत शिक्षकाची हिरोगिरी, पीडित मुलीने केली पोलखोल

Nashik : 'फुल हे गुलाब का..' आश्रम शाळेत शिक्षकाची हिरोगिरी, पीडित मुलीने केली पोलखोल

मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावला असल्याची बातमी समोर आली होती.

  नाशिक, 03 ऑगस्ट : नाशिकमध्ये (nashik) मागच्या काही दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये विचित्र प्रकार घडला होता. एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिले नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावला असल्याची बातमी समोर आली होती. यावर त्या मुलीकडून आवाज उठवण्यात येणार आहे. पिडीतीने महिला हक्क आयोगाला पत्र लिहले आहे.

  यामध्ये तीने पत्रात लिहले आहे कि, समितीचा जो अहवाल आलेला आहे तो मला मान्य नाही. हे साफ खोटा आहे जे माझ्या सोबत घडल आहे ते सर्व खर आहे मी जे बोलले आहे त्यातला एकुण एक शब्द हा खरा आहेत. म्हणून जो अहवाल आलेला आहे तो मला मान्य नाही हे सर्व शिक्षकांना पाटीशी घालण्याचं काम चालू आहे. म्हणून मी या अहवालाचा निषेद करते.

  हे ही वाचा : संजय राऊत झाले आता शरद पवार आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी

  सर शाळेत शिकवत असताना डायलॉग करायचे. फूल हे गुलाब का उसे सुखणे मत देना, पुढे मला काय म्हणायचे आहे ते समजुन घ्या असे सर हसून म्हणायचे, याबाबत काही मुलींना याचा राग यायचा याचा मला पण राग येत असे, म्हणून मी सरांना याबाबत बोललो कि सर शिकवणे सोडून अस डायलॉग का मारता तर ते बोले की वावीच्या हे का कळते, याच जास्त शहाण्या आहेत. बोलत घरी राहुन तु काय उपयोग करते, म्हणुन तु तुझी UPT करुन ये, म्हणजे मला कळेल काय काय उद्योग करते. या शिवाय तुला शाळेत घेणार नाही. यासगळ्या नंतर मी जेव्हा आईला घेऊन गेलो त्यावेळी, तु निघुन जा. तुला कोणी परवानगी दिला. असे सर म्हणत असल्याचे पिडीता म्हणाली.

  तुझा दाखला काढून देतो, व सामुंडीच्या शाळेत जा, मी नंबर लावून देतो, तुला जशी पाहिजे आहे ती तिकडे आहे, असे सर बोलूण मुलींना रागवायचे. शाळेत तक्रार केल्यानंतर अनेक मुलींना त्यांनी बोलण्यास शिकवले, मी तक्रार केल्यानंतर ते सलग ६ दिवस शाळेवर थांबले माझी हजेरी पूर्ण खोटी बनवली, मी शाळेत असताना स्वता देवगांव हट्टीपाडा येथील चंद्रकला वारे या मुलीच अँडमीशन करणेसाठी त्यांना मदत केली होती. ज्या सवयी सरांच्या मला आवडत नव्हत्या या बद्दल मी बोलत असे. 

  मी खोटा आरोप का करू मी खरे बोलून देखील मला, माझे म्हणणे खोटे ठरवण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. हे सर्व अधिकारी या शिक्षकांस आपल्या पाठी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षक जेव्हा गैर वर्तनाने वागतात यावर कोणी जाब विचारत नाही परंतु मला खोटे ठरविले जात आहे. म्हणून माझ्यावर केलेला आरोप हा खोटा असून प्रशासन व सरांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे. असे त्या पिडीतेने पत्र लिहून तक्रार दिली आहे.

  हे ही वाचा : महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, चेक करा नवे दर

  नाशिकमधील पीडित मुलगी राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. मासिक पाळीमुळे शिक्षकाने शाळेत वृक्षरोपण करू दिले नाही पीडित मुलीने केला होता आरोप या आरोपानंतर त्या शिक्षकांकडून खंडण करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील देवगाव आदिवासी आश्रम शाळेत हा प्रकार घडला होता. याच आरोपाची चौकशी केल्यानंतर आदीवासी विभागाने शिक्षकाला क्लिनचीट दिले होते. सदर मुलगी त्या दिवशी शाळेत हजरच नव्हती असे रिपोर्ट मध्ये नमूद करत शिक्षकाला क्लिनचीट दिली होती. 

  याच निर्णयाविरोधात सदर मुलगी आणि काही सामाजिक संघटना आज राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे. दरम्यान या प्रकरणाने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Crime news, Nashik

  पुढील बातम्या