मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वारकरी पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडला जीव; तासाभरात दोन जीवांच्या जाण्याने गावावर शोककळा

वारकरी पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडला जीव; तासाभरात दोन जीवांच्या जाण्याने गावावर शोककळा

वारकरी पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडला जीव

वारकरी पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडला जीव

नाशिकमध्ये पतीच्या निधनानंतर पत्नीनेही जीव सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Rahul Punde

नाशिक, 18 जानेवारी : जोडीदाराच्या विरहात जीवण जगणे अनेकांना कठीण होते. अनेकजण कोलमडून पडतात तर काहीजण त्यातून उभे राहतात. नाशिकमधील घटनेने मात्र जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी संप्रदायात सक्रीय सहभाग असणारे हिरामन पंढरीनाथ देवरे यांचं निधन झालं, पतीच्या निधनाची बातमी ऐकताच पत्नीला देखील हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचेही निधन झाले आहे. अवघ्या तासाभरात पती पत्नीचे निधन झाल्याने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. तर या बातमीने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तासाभरात पतीपत्नीचा मृत्यू

वारकरी हिरामन देवरे यांच्यावर आठ दिवसांपासून नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच दरम्यान रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचं निधन झाले. ही बातमी त्यांच्या गावी उमराणे येथे असलेल्या त्यांची पत्नी विमलबाई देवरे यांना समजली. अचानक पतीच्या निधनाची बातमी ऐकल्याने त्यांना मोठा धक्का बसला. पतीच्या जाण्याने अश्रु अनावर होत असताना त्यांची तब्येत खालावली आणि त्यांचाही त्यात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण उमराणे गावावर शोककळा पसरली आहे.

वाचा - Maharashtra Konkan Cold Wave : पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर थंडीचा जोर वाढणार, अलर्ट जारी

घटनेने संपूर्ण गावावर शोककळा

या घटनेने देवरे कुटुंबावर हा दुख:चा डोंगर कोसळला आहे. देवरे दाम्पत्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार हे उमराणे येथेच करण्यात आले. दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पानावले होते. देवरे कुटुंब हे वारकरी संप्रदायातील असल्याने दिंडीत त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्यांच्या जाण्याने गावात वारकरी संप्रदायात दरी निर्माण झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. जोडीदार मग तो पती असो की पत्नी यापैकी एकाच्या जाण्याने दुसऱ्याचं जगणं कठीण होत असतं. अनेकांना जोडीदाराचा विरह सहन होत नाही. अशावेळी पतीच्या निधनाचा धसका घेऊन पत्नीनेही प्राण सोडल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

First published:

Tags: Nashik