नाशिक, 01 डिसेंबर : राज्यातील काही जिल्ह्यात हेल्मेट सक्ती आहे परंतु या हेल्मेट सक्तीचे काही जिल्ह्यात कडक आदेश आहेत तर काही ठिकाणी नाहीत. दरम्यान आता हेल्मेट सक्तीच्या यादीत अजून एक जिल्ह्याचा समावेश झाला आहे. आजपासून पुन्हा नाशिक शहरात दोन चाकीसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहन चालवताना हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई आणि पाचशे रुपयांचा दंडही आकारला जाण्यात येणार आहे. नाशिकमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हेल्मेट घालणे बंधनकारक आवश्यक आहे.
नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हेल्मेट सक्ती केली होती. दरम्यान त्यांच्या काळात हेल्मेट सक्तीचे काटेकोर पालन केले जायचे परंतु त्यांची बदली झाल्यानंतर नाशिकमध्ये हेल्मेट सक्तीचा मुद्दा मागे पडला होता.
हे ही वाचा : काय सांगता! थेट नोटा छापण्याच्या कारखान्यात जॉबची संधी; महिन्याचा 95,000 रुपये पगार; लगेच करा अर्ज
परंतु आता पुन्हा हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली असून आजपासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून दुचाकी चालकांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्यावर आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. कारवाईला सामोरे जायचे नसल्यास चांगल्या प्रतीचे हेल्मेट दुचाकी धारकांना वापरणे बंधनकारक आहे. आजपासून काही दिवस थंडावलेल्या हेल्मेटसक्ती मोहिमेला नाशिककरांना पुन्हा सामोरे जावे लागणार आहे.
हे ही वाचा : भावासोबत झालेल्या भांडणाचा राग चिमुकल्यावर काढला; नाशिकच्या आश्रमशाळेतील हत्येचं गूढ उकललं
या ठिकाणी असतील चेकींग पॉईंट
नाशिक पोलिसांकडून शहरातील चेकिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. आज शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत गाड्यांची चेकिंग होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.