मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik Flood : अती घाई संकटात नेई, कॉलेजला जाण्याच्या गडबडीत मुलीने पुरातून गाडी घातली अन् गेली वाहून

Nashik Flood : अती घाई संकटात नेई, कॉलेजला जाण्याच्या गडबडीत मुलीने पुरातून गाडी घातली अन् गेली वाहून

नाशिक जिल्ह्यातील अकरावीत शिकणारी मुलगी पुराच्या पाण्यातून जात असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (Nashik Flood)

नाशिक जिल्ह्यातील अकरावीत शिकणारी मुलगी पुराच्या पाण्यातून जात असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (Nashik Flood)

नाशिक जिल्ह्यातील अकरावीत शिकणारी मुलगी पुराच्या पाण्यातून जात असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (Nashik Flood)

  • Published by:  Sandeep Shirguppe

नाशिक, 20 सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यात मागच्या कित्येक दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. (Nashik Flood) दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने काहीजण वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील अकरावीत शिकणारी मुलगी पुराच्या पाण्यातून जात असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यात ही घटना घडली आहे. तन्वी विजय गायकवाड असे या अकरावीत शिकणाऱ्या तरुणीचे नाव आहे. याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या तरीही त्या मुलीने गाडी नेल्याने ही घटना घडली.

दहावीला चांगले मार्क मिळाल्याने तन्वी विजय गायकवाड ही मुलगी शहराच्या ठिकाणी असलेले काकासाहेब वाघ कनिष्ठ महाविद्यालयात ती अकरावीला सायन्स करत होती. तन्वी निफाड तालुक्यातील शिवडी ह्या मामाच्या घरातून सोमवारी (19 सप्टेंबर) सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकीने निघाली होती.

हे ही वाचा : aurangabad water management : गंमतच झाली एका उंदराने चक्क ‘या’ स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद

मात्र जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे विनता नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी उगाव-खेडे गावादरम्यान असलेल्या पुलावरुन वाहत होते. तरी देखील तन्वीने आपली दुचाकी पुलावर नेली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही सेकंदातच ती गाडीसह वाहून गेली.

हे बघताच स्थानिक नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावरच असलेल्या संत जनार्दन स्वामी पर्णकुटीजवळून तन्वीला बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल तर करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तन्वी निफाड तालुक्यातील रुई इथल्या विजय गायकवाड यांची कन्या होती. शिक्षणासाठी शिवडी इथे मामाकडे राहून कॉलेजला येणं-जाणं करत होती.

हे ही वाचा : कुत्रा भुंकत असल्याने भडकला व्यक्ती; रागात पाठलाग करत क्रूरतेचा कळस गाठला

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे तरुण मुलीचा अशाप्रकारने मृत्यू झाल्यामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान पूरपरिस्थिती ओढावताच प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. पुराच्या पाण्यात जाऊ नका असं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र नागरिकांकडून ही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही आणि अशाप्रकारच्या घटना समोर येतात. प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत पुराच्या पाण्यात गाडी नेल्याने तरुणीचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Nashik, Rain, Rain fall, Rain flood

पुढील बातम्या