मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

8 वाहनांसह अनेक पादचाऱ्यांना उडवलं; अपघातानंतर प्राध्यापक म्हणतोय 'खोकला झाला की ब्रँडी प्यावी म्हणून...'

8 वाहनांसह अनेक पादचाऱ्यांना उडवलं; अपघातानंतर प्राध्यापक म्हणतोय 'खोकला झाला की ब्रँडी प्यावी म्हणून...'

पोलीस तपासात प्राध्यापकाने धक्कादायक खुलासा केला आहे. प्राध्यपकाच्या म्हणण्यानुसार, 'खोकला झाला की ब्रँडी प्यावी'  असं या प्राध्यापकाने व्हॉट्सअॅपवर ऐकलं होतं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Kiran Pharate

नाशिक 20 नोव्हेंबर : रस्ते अपघात दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. देशात रस्ते अपघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या गंभीर आहे. अशातच शनिवारी नाशिकमधून एका विचित्र अपघाताची घटना समोर आली होती. यात मद्यधुंद चालकाने अनेक गाड्यांना धडक दिली होती. विशेष म्हणजे हा चालक प्राध्यापक आहे. यानंतर आता या घटनेबाबत बोलताना प्राध्यापकाने अतिशय विचित्र कारण दिलं आहे.

वृद्ध दाम्पत्य गाढ झोपेत असतानाच अचानक घराला लागली आग अन्...; वसईतील मध्यरात्रीचा थरार

पोलीस तपासात प्राध्यापकाने धक्कादायक खुलासा केला आहे. प्राध्यपकाच्या म्हणण्यानुसार, 'खोकला झाला की ब्रँडी प्यावी' असं या प्राध्यापकाने व्हॉट्सअॅपवर ऐकलं होतं. म्हणून ब्रँडीची अख्खी बाटलीच रिचवल्याची कबुली या प्राध्यापकाने दिली आहे. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेतच प्राध्यापकाने गाडी चालवली.

या अपघातानंतर पोलिसांनी चौकशी केली असता काय झालं ते काहीच आठवत नसल्याचा दावा प्राध्यापकाने केला आहे. पोलिसांनी प्राध्यापक साहेबराव निकम याच्यावर मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. प्राध्यापकाच्या वाहनाने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात 7-8 वाहनांचं नुकसान झालं आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

कारची एकच धडक, ट्रॅक्टरचे झाले 3 तुकडे, 2 चिमुरडे थोडक्यात बचावले, VIDEO

या घटनेत मद्यधुंद चालकाने वेगानं गाडी चालवत रस्त्यावरील अनेक गाड्यांना धडक दिली. इतकंच नाही तर कारने काही पादचाऱ्यांनाही उडवलं. या धडकेत 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. याच जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातानंतरचा एक व्हिडिओही समोर आला होता. व्हिडिओमध्ये पोलीस ही कार थांबण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, हा मद्यधुंद चालक थांबायला तयार होत नाही. पोलीस पाठलाग करत असतानाही तो आपली कार वेगात चालवताना दिसतो. अखेर पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेत चौकशी केली असून गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Accident, Shocking news