मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik Breaking: नाशकातल्या एका महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव, 17 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह

Nashik Breaking: नाशकातल्या एका महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव, 17 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह

नाशिकमधून (Big news) एक मोठी बातमी येत आहे. नाशिकमधल्या (Nashik)  एका महाविद्यालयात कोरोनानं शिरकाव केला आहे.

नाशिकमधून (Big news) एक मोठी बातमी येत आहे. नाशिकमधल्या (Nashik) एका महाविद्यालयात कोरोनानं शिरकाव केला आहे.

नाशिकमधून (Big news) एक मोठी बातमी येत आहे. नाशिकमधल्या (Nashik) एका महाविद्यालयात कोरोनानं शिरकाव केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नाशिक, 03 जानेवारी: नाशिकमधून (Big news) एक मोठी बातमी येत आहे. नाशिकमधल्या (Nashik) एका महाविद्यालयात कोरोनानं शिरकाव केला आहे. महाविद्यालयातील 17 विद्यार्थिनी कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे नाशकात चिंतेचं वातावरण आहे.

नाशिकच्या पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील 17 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. वसतिगृह व्यवस्थापनाने 52 विद्यार्थिनींच्या टेस्ट केल्यानंतर त्यापैकी या 17 मुली पॅाझिटिव्ह आढळल्या. त्यानंतर महापालिका आरोग्य पथकानं वसतिगृहात जाऊन पाहणी केली आहे.

17 विद्यार्थिनी पॅाझिटिव्ह आल्यानंतर त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर मुलांचे रिपोर्ट आज येणार आहेत. त्यातच जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

मुंबईत कोरोनाचा पुन्हा एकदा थैमान

मुंबईत रविवारी आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा (Corona Virus) मोठा विस्फोट होताना दिसत आहे. रविवारी मुंबईत कोरोना व्हायरसचे 8,063 नवीन रुग्ण आढळले, जे शनिवारी झालेल्या संसर्गाच्या प्रकरणांपेक्षा 1,763 अधिक आहेत. अधिका-यांनी सांगितले की शहरात शनिवारी संसर्गाची 6,347 प्रकरणे आणि रविवारी 27 टक्के अधिक प्रकरणे आढळली.

हेही वाचा- आई जेवण बनवण्यात व्यस्त, बादलीत पडला एक वर्षाचा चिमुरडा; अन्...

गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या 578 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सध्या शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 29,819 आहे. रविवारी आढळलेल्या 89 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत.

राज्यात कोरोनाचे 11000 हून अधिक रुग्ण, Omicron चे 50 नवीन रुग्ण

दरम्यान, रविवारी राज्यात कोविड-19 चे 11,877 नवीन रुग्ण आढळून आले, जे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा 2,707 अधिक आहेत आणि ओमायक्रॉनचे 50 प्रकरणे आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने एका बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, राज्यात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संसर्गाच्या 11,877 प्रकरणांपैकी मुंबईत 7,792 रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात कोविड-19 चे 9,170 नवीन रुग्ण आढळले.

राज्यात ओमायक्रॉनचे एकूण 510 रुग्ण, 193 स्वस्थ

राज्यातील 50 ओमायक्रॉन प्रकरणांपैकी 36 पुणे महापालिकेत, आठ पिंपरी चिंचवड महापालिकेतील, पुणे ग्रामीण आणि सांगलीत प्रत्येकी दोन आणि मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक प्रकरणे नोंदवली गेली. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 510 रुग्ण आढळले असून त्यापैकी 193 जण संसर्गमुक्त झाले आहेत.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases, Nashik