मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिक: नगरपंचायतीचा निकाल येण्यापूर्वीच काँग्रेस उमेदवाराचा अपघाती मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

नाशिक: नगरपंचायतीचा निकाल येण्यापूर्वीच काँग्रेस उमेदवाराचा अपघाती मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

नगरपंचायत निवडणुकीचा निकाल येण्याआधीचं उमेदवाराचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

नगरपंचायत निवडणुकीचा निकाल येण्याआधीचं उमेदवाराचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

नगरपंचायत निवडणुकीचा निकाल येण्याआधीचं उमेदवाराचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

  • Published by:  Sunil Desale

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 15 जानेवारी : नाशिकमध्ये एक भीषण अपघात (accident in Nashik) झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मृतकांपैकी एका तरुणाने नगरपंचायतीची निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. पंकज पवार (Pankaj Pawar) असे त्याचे नाव असून या घटनेने संपूर्ण गावावर एक शोककळा पसरली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana Nashik) येथे हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणामध्ये भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली आणि झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात पंकज पवार याचा मृत्यू झाला. पंकज पवार याने सुरगाणा नगरपंचायतीच्या प्रभाग 12 मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीचा निकाल 19 जानेवारी रोजी येणार आहे. मात्र, निवडणूक निकालाच्या आधीचं पंकज पवार या उमेदवाराच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होत आहे.

वाचा : नाशिकच्या जवानाला सीमेवर वीरमरण, मकरसंक्रांतीच्या दिवशी गावावर कोसळला दुखाचा डोंगर!

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज पवार हा आपल्या मित्रांसोबत वणी येथून सुरगाणाकडे निघाला होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घागबारी फाट्याजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली आणि एका झाडाला धडक दिली. गाडीचा वेग इतका होता की या अपघातात पंकज पवार आणि भोला या दोघांचा मृत्यू झाला. तर त्यांचा तिसरा मित्र राहुल चौधरी हा अपघातात गंभीर जखमी झाला.

पंकज पवार आणि भोला या दोघांच्याही डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी राहुल याला उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा : यूपी जिंकण्यासाठी भाजपची नवी खेळी; 63 जणांना पुन्हा संधी तर 20 आमदारांना नारळ

19 जानेवारी रोजी मतमोजणी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.

First published:

Tags: Accident, Nashik, काँग्रेस