मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik Crime News: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले अन् मंगळसूत्र हिसकावून पळाले, नाशकातील घटनेचा CCTV

Nashik Crime News: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले अन् मंगळसूत्र हिसकावून पळाले, नाशकातील घटनेचा CCTV

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले अन् मंगळसूत्र घेऊन पळाले, नाशकातील घटनेचा CCTV

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले अन् मंगळसूत्र घेऊन पळाले, नाशकातील घटनेचा CCTV

Nashik chain snatching cctv: नाशिकमध्ये एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

  • Published by:  Sunil Desale

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 20 डिसेंबर : नाशकात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशकात हत्या सत्र सुरू असतानाच आता चैन स्नॅचिंगच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. नाशकात (Nashik) दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. ही संपूर्ण घटना त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Chain snatching caught in cctv)

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले आणि...

मिळालेल्या माहितीनुसार, नाशकातील सिडको परिसरात असलेल्या उत्तम नगर येथे ही घटना घडली आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेला घारतून बाहेर बोलावले. त्यानंतर पत्ता विचारत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. मग, त्यापैकी एकाने महिलेच्या गळ्यातील मंगळूत्र हिसकावले आणि दोघेही आरोपी दुचाकीवरुन पळून गेले.

वाचा : लैंगिक समस्येवर उपचारासाठी गेला अन् भलतीच समस्या घेऊन आला

शिकाऊ ग्रामसेवकच निघाला सोनसाखळी चोर

नाशिक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सोनसाखळी चोरी प्रकरणात केलेल्या एका कारवाईत चांदवड तालुक्यातील एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आल्यावर त्याची चौकशी केली असता तो शिकाऊ ग्रामसेवक (Trainee gram sevak) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपकडून पोलिसांनी सुमारे 5 लाखांचे 11 तोळे सोने व दुचाकी जप्त केलीय. विपूल रमेश पाटील असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. विपूल पाटील याने कोरोनाकाळात 14 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारला होता असा अंदाज पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आलं आहे.

नाशिकमध्ये शिल्पकाराच्या आर्ट स्टुडिओत दरोडा

नाशिकमध्ये प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांच्या सातपूर नजिकच्या बेळगाव ढगा येथील आर्ट स्टुडिओवर संशयितांनी दरोडा टाकल्याची घटना नुकतीच समोर आली होती. चोरांनी वॉचमन आणि त्याच्या पत्नीस कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत साडेआठ लाख रुपयांचे महापुरुषांच्या पुतळ्याचे ब्राँझ धातूचे भाग जबरीने चोरुन नेले. स्टुडिओवर पाळत ठेवून तसेच किंमती ब्राँझ धातूच्या चोरीसाठीच दरोड्याचा हा धाडसी प्रकार झाल्याचा अंदाज सातपूर पोलिसांनी वर्तवला होता.

नाशिकच्या सातपूर नजिकच्या बेळगाव ढगा येथे शिल्पकार गर्गे यांचा आर्ट स्टुडिओ आहे. देश-विदेशातील नामवंत शिल्प येथे घडवले जातात. वॉचमन जयदेव किसन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी (6 डिसेंबर) पहाटे आठ ते दहा अनोळखी संशयितांनी कारखान्यात प्रवेश केला. जयदेव यास कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करण्यात आली. तर त्याची पत्नी शैलाबाईला मारुन टाकण्याची धमकी देत दहशत निर्माण करण्यात आली.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Nashik