Home /News /maharashtra /

बापरे! भाजी खरेदीसाठी गेलेल्या वयोवृद्धाला बैलाने शिंगावर उचलून घेतलं अन् दूर फेकलं, नाशकातील LIVE VIDEO

बापरे! भाजी खरेदीसाठी गेलेल्या वयोवृद्धाला बैलाने शिंगावर उचलून घेतलं अन् दूर फेकलं, नाशकातील LIVE VIDEO

बापरे! वयोवृद्धाला बैलाने शिंगावर घेतलं अन् दूर फेकलं, नाशिकमधील LIVE VIDEO

बापरे! वयोवृद्धाला बैलाने शिंगावर घेतलं अन् दूर फेकलं, नाशिकमधील LIVE VIDEO

Nashik News: सातपूर येथील भाजी मार्केटमधील ही घटना आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 28 मे : नाशिकच्या (Nashik) सातपूर (Satpur) भाजी मार्केटमध्ये नागरिकांना मोकाट जनावरांचा त्रास सहन सरावा लागत आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याच दरम्यान आता एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ दिसत आहे की, भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर बैलाने हल्ला केला. इतकंच नाही तर या वृद्धाला पाठीमागून बैलाने आपल्या शिंगावर उचलले आणि मग फेकून दिलं. ही संपूर्ण घटना बाजारातील एका दुकानासमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद (Caught in CCTV) झाली आहे. या सीसीटीव्हीत दिसत आहे की, नागरिक बाजारात खरेदीसाठी आलेले आहेत. एक वयोवृद्ध रस्त्यावरुन चालत असताना पाठीमागून बैल येतो आणि त्या वृद्धाला शिंगावर घेऊन मग खाली जोरात आपटतो. सुदैवाने ज्येष्ठ नागरिक असलेल्या या व्यक्तीला कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाहीये. मात्र, मोकाट जनावरांच्या त्रासाला आधीच कंटाळलेल्या नागरिकांनी आता या जनावरांचा बंदोबस्त तात्काळ करण्याची मागणी केली आहे. पुण्यात म्हैस उधळली! रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीला धडकली पुण्यात रस्त्यावरुन जाणारी म्हैस अचानक उधळली आणि त्यानंतर थेट दुचाकीला धडक दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली होती. या म्हशीने रस्त्यावरील दोन दुचाकींना धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले होते. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. कॅम्प परिसरात 8 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी साधारणतः पावणे चार वाजण्याच्या सुमारास काही महिला दुकानात प्रवेश करत होत्या तर कुणी दुचाकीवरुन जात होते. त्याच दरम्यान म्हैस रस्त्यावरुन जात होत्या आणि त्यापैकी एक म्हैस उधळली. म्हैस उधळून थेट समोरुन येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. सीसीटीव्हीत आपण पाहू शकतो की, उधळलेल्या म्हशीने दोन दुचाकींना धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील पती आणि पत्नी जखमी झाले आहेत. दुचाकी चालक जुबेर शेख हे पत्नीसोबत जात असताना वरशी मस्जिद जवळ ही घटना घडली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Nashik, Shocking viral video

    पुढील बातम्या