मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik : नाशकात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांचा खून

Nashik : नाशकात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांचा खून

नाशकात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

नाशकात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

Nashik News: नाशकात पुन्हा एकदा राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 26 नोव्हेंबर : नाशकात हत्येचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. नाशकातील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे (Nashik BJP leader Amol Eghe) यांची हत्या करण्यात आली आहे. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष होते. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. भजाप पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik BJP leader brutally murdered)

हत्येमागचं कारण काय?

भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांचा मृतदेह सातपूरच्या कार्बन नाका परिसरात सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

राजकीय पदाधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या कऱण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नाशकात आरपीआयच्या महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. महिन्याभरात झालेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हत्येने नाशकात खळबळ उडाली आहे.

वाचा : आमदाराला पाहताच चोरासारखे पळाले पोलीस; कन्नड घाटात वसुलीचा भांडाफोड, पाहा VIDEO

काही दिवसांपूर्वी आरपीआय महिला पदाधिकारी पूजा आंबेकरची हत्या

ऐन दिवाळीत नाशकात एका महिलेची चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली होती. मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकर (Pooja Ambekar) असं असल्याची माहिती समोर आली होती. पूजा आंबेकर ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा आंबेकर या आरपीआयच्या पदाधिकारी होत्या. दिवाळीत रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल 20 ते 25 वार केले. सोबत राहणाऱ्या इसमानेच हत्या केली असल्याचा संशय आहे.

संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंगापूर पोलीस या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वाचा : मोठा भाऊ घरी नसताना दिराने वहिनीचा गळा चिरला; पोलीस ठाण्यात झाला दाखल

किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार 24 नोव्हेंबर रोजी नाशकात उघडकीस आला होता. किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. नाशिकमधील म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ (Mhasrul RTO office Nashik) ही हत्या झाली. राजू शिंदे अस मयत तरुणाचे नाव आहे. जोपर्यंत मयत होत नाही तोपर्यंत आरोपीने दगडाने डोके ठेचले आणि निर्घृण हत्या केली आहे. मयत राजू शिंदे याचे भाजीपाल्याचे छोटे दुकान आहे. दुकानाच्या वर्चस्ववादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: BJP, Crime news, Nashik