मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशिकमधील विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 13 दिवस बंद राहणार विमानतळ, ही आहे पर्यायी व्यवस्था

नाशिकमधील विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 13 दिवस बंद राहणार विमानतळ, ही आहे पर्यायी व्यवस्था

वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हे विमानतळ 13 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या काळात विमानतळावरून कुठल्याही विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग होणार नाही

वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हे विमानतळ 13 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या काळात विमानतळावरून कुठल्याही विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग होणार नाही

वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हे विमानतळ 13 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या काळात विमानतळावरून कुठल्याही विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग होणार नाही

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक 31 ऑक्टोबर : नाशिकमधील विमान प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिकमधील ओझर विमानतळ दुरुस्तीसाठी पुढील काही दिवस बंद राहणार आहे. 20 नोव्हेंबरपासून नाशिक विमानतळ दुरुस्तीसाठी 13 दिवस बंद राहील. हवाई संचनालयाच्या निर्देशानुसार याठिकाणी धावपट्टीची दुरुस्ती केली जाणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अडीच किमी लागली वाहनांची रांग

वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हे विमानतळ 13 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या काळात विमानतळावरून कुठल्याही विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग होणार नाही. 13 दिवसांनंतर म्हणजेच 4 डिसेंबरपासून हे विमानतळ पुन्हा सुरू करण्यात येईल. विमानतळ व्यवस्थापनाने याबाबतची माहिती दिली आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या धावपट्टीच्या रिसर्फेसिंगचं काम केलं जाणार आहे. सध्या याविमानतळावरून स्पाइड जेटची विमान सेवा सुरू असते. दिल्ली आणि हैदराबाद येथे जोडणारी ही सेवा आता पुढे 13 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे उद्योजक आणि पर्यटकांची गैरसोय होणार आहे.

उड्डाण करतानाच इंडिगो विमानाच्या इंजिनला आग, दिल्ली विमानतळावरील Shocking Video

हे काम हिवाळ्यातच करावं लागत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या 13 दिवसांच्या काळात या विमानतळावरुन दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी दिली जाणारी विमान सेवा बंद राहणार आहे. ही विमाने शिर्डी येथे वळवली जातील. यामुळे विमान प्रवाशांना नाशिकऐवजी शिर्डीतून ही विमानं पकडावी लागतील. नाशिक विमानतळावरील सेवा ही 3 डिसेंबरनंतरच सुरू होईल. नाशिकमधील हे विमानतळ लष्करी सेवेसाठी असलं तरी आता ते नागरी हवाईसाठी खुलं करण्यात आलं आहे. त्यामुळे, नागरिकांचा प्रवास सोपा झाला आहे. मात्र ऐन पर्यटनाच्या काळात आता ही विमानसेवा काही दिवसांसाठी बंद राहणार असल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Airport, Nashik