लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 27 मे : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात बेकरी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. इंद्रकुंड भागात ही दुर्घटना घडली असून रिहान उमेश शर्मा (रा. हिमालय हाऊस, इंद्रकुंड, पंचवटी) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटीतील इंद्रकुंड परिसरात राहणार्या शर्मा कुटुंबाचा बेकरीचा व्यवसाय आहे. शर्मा यांच्या राहत्या घरातच एका बाजूला बेकरीचे सर्व साहित्य व व्यवसाय आहे. या ठिकाणी रिहान गुरुवारी (दि.25) रात्री 9 वाजेच्या सुमारास खेळत होता. त्यावेळी बेकरी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी गिरणी (ग्रँडर) बंद होती. रिहान खेळता-खेळता त्या गिरणीत दुर्दैवाने तोल गेल्याने पडला. तितक्यात गिरणी चालू झाल्याने तो गिरणीतील पात्यांसह बेल्टमध्ये अडकल्याने कोवळया हाडांचा चेंदामेंदा झाला होता.
मुंबईतील तरुणानं महिलेची हत्या करून दाताने ओरबडून खाल्लं चेहऱ्याचं मांस, दृश्य पाहून पोलीसही हादरले
रिहान गंभीर जखमी झाला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची अनेक हाडे फॅक्चर असल्याचे समोर आले डॉक्टरांकडून त्याच्यावर औषधोपचार सुरू असतांना रात्री त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केल्यानंतर त्याच्या पालकांनी रुग्णालयातच मृत्यूचा हंबरडा फोडला रिहान हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
रिहानच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या हाडांचे अनेक तुकडे झाले होते. या दुर्घटनेत त्याला कोणतीही जखम न झाल्याने रक्त शरीराबाहेर पडले नाही. मात्र, अंतर्गत रक्तस्त्राव होऊन सर्व हाडे मोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची नोंद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik