मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik: इगतपुरीतील आश्रमशाळेत 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

Nashik: इगतपुरीतील आश्रमशाळेत 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus in Maharashtra: ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका असतानाच आता नाशकातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Coronavirus in Maharashtra: ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका असतानाच आता नाशकातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Coronavirus in Maharashtra: ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका असतानाच आता नाशकातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 10 डिसेंबर : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील निर्बंध हटवण्यात आले. शाळा-महाविद्यालये सुरू (Maharashtra School - Colleges reopen) करण्यात आले. मात्र, त्याच दरम्यान आता नाशकातून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्.याने एकच खळबळ उडाली आहे. (15 students tests positive for coronavirus in Nashik Igatpuri ashram school)

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील 15 विद्यार्थअयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यांनंतर त्याची कोविड चाचणी केली. या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली.

वाचा : फक्त या एका गोष्टीमुळेच Omicron सारख्या कोरोनाचा धोकाही 225 पटींनी कमी होतो; तज्ज्ञांचा दावा

या चाचणीत एकूण 15 विद्यार्थ्यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. आता प्रशासनाकडून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह इतर 340 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळेत काम करणारे इतर कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे.

लहान मुलांना विळख्यात घेतोय कोरोना; US-यूरोपमध्ये स्थिती चिंताजनक

गेल्या एका आठवड्यात अमेरिकेत 133,000 हून अधिक मुले कोरोनाच्या विळख्यात आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनने संयुक्त अहवाल जारी करून ही माहिती दिली आहे. आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की अमेरिकेत सध्या आढळलेल्या एकूण संक्रमित रुग्णांपैकी 11 टक्के लहान मुलं आहेत. शास्त्रज्ञ अँटनी फाउची यांनी अलीकडेच सांगितलं की, देशात ओमिक्रॉनशी (Omicron) संबंधित फारच कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत, तरीही डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta Variant) संसर्ग पसरणं कायम आहे.

युरोपियन शाळांमध्ये कोरोना क्लस्टर्सची अनेक प्रकरणे आढळल्यानंतर चिंता वाढली आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, ग्रीससह अनेक देशांतील शाळांमध्ये सामुदायिक संसर्गाच्या प्रकरणांमुळे शिक्षक आणि मुलांना आयसोलेट करावं लागलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही युरोपीय देशांना शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने मुलांना लवकरात लवकर लसीकरण करता येईल.

मुंबईसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी

मुंबई, ठाणे, पुणे सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे धाकधूक वाढली होती. याआधी कोरोनाच्या ज्या दोन लाटा आल्या होत्या त्यामध्ये मुंबई आणि पुणे ही दोन शहरं सर्वाधिक बाधित ठरली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे या आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी आणखी सक्षम होण्याची जास्त गरज असल्याचं बोललं जात होतं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक खूप मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगचे नवे रिपोर्ट समोर आले आहेत. त्यामध्ये ओमायक्रोनबाधित रुग्णाची संख्या ही केवळ 2 असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे, असं नमूद करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Nashik, Students