मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आम्ही मित्रांना दगा देत नाही.. नाना पटोले यांची आघाडीवर उघड नाराजी, म्हणाले असं असेल तर..

आम्ही मित्रांना दगा देत नाही.. नाना पटोले यांची आघाडीवर उघड नाराजी, म्हणाले असं असेल तर..

आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चा करून निर्णय घ्यायला हवा आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. पण हे साधं बोलायला विचारायला तयार नाही, अशी टीकाही पटोलेंनी सेनेवर केली.

आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चा करून निर्णय घ्यायला हवा आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. पण हे साधं बोलायला विचारायला तयार नाही, अशी टीकाही पटोलेंनी सेनेवर केली.

आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चा करून निर्णय घ्यायला हवा आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. पण हे साधं बोलायला विचारायला तयार नाही, अशी टीकाही पटोलेंनी सेनेवर केली.

  लक्ष्मण घाटोल, नाशिक नाशिक, 12 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकार (mva government) सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आता तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेवरुन काँग्रेस नाराज झाली आहे. 'महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही, ना कोणतीही पर्मनंट आघाडी नाही. विपरीत परिस्थितीत एकत्र आलेले पक्ष आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह आहे. आघाडीत समन्वय नाही : पटोले मैत्री असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजे. आपल्या मताने गोष्टी करायच्या तर त्याला मैत्री म्हणत नाही. 'पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो. आमची आघाडी विपरीत परिस्थिती मध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चा करून निर्णय घ्यायला हवा आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. पण हे साधं बोलायला विचारायला तयार नाही, अशी टीकाही पटोलेंनी सेनेवर केली. मला ज्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितलं तेव्हा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगायला गेलो होतो. पण त्यांना औपचारीकता पाळायची नसेल तर ठीक आहे. कोणावर जबरदस्ती नाही. काँग्रेस हा जनतेतला पक्ष आहे. निश्चितपणे जनता काँग्रेस सोबत आहे. मित्रांनी प्रामाणिक रहावे.

  'त्यांना अतिशय तरूण वयात संधी मिळाली त्यामुळे..'; पंकजा मुंडेंच्या नाराजीवर केसरकरांची प्रतिक्रिया

  विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरुन नाराजी विधान सभेत राष्ट्रवादी विरोधीनपक्ष नेते झाले, विधान परिषद नेतेपद आम्हाला हवे होते बसून निर्णय घेता आला असता. मात्र, आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला, असं म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. विधानसभा सभागृहात राष्ट्रवादीचे अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. वरच्या सभागृहात नीलम गोऱ्हे उपसभापती आहे. आमच्या खूप कमी जागा आहे, असा विषय नाही. सगळ्यांच्या बरोबर जागा आहे. राष्ट्रवादीच्या 10 जागा आहे, आमच्याही 10 जागा आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. नाहीतर त्यांचेही दहा होते. आम्ही मित्र घेऊन चालणारे लोक आहोत, मित्रांना दगा देत नाही. विधान सभेत राष्ट्रवादी विरोधीनपक्ष नेते झाले, विधान परिषद नेतेपद आम्हाला हवे होते बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला, असं म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. भाजपला मित्र पक्ष सोडून जातायेत एक एक करून सगळे पक्ष भाजपला सोडून जात आहे. बिहारमध्ये नितीश कुमार सोडून गेले. हाच फरक आहे. आम्ही जोडायाचे काम करतो, भाजप तोडायचे काम करत आहे. म्हणून एडीएमधील घटक पक्ष सोडून जात आहे. भाजपजवळ वॉशिंग मशिन आहे. एक वारकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. वारकरी लोकं खोटे बोलत नाही. आपण भाजपच्या विरोधात बोललो, तर कारवाई होते. भाजपच्या पाठीशी राहिलो तर स्वच्छ होतो. असं सामान्य माणूस देखील बोलत आहे. भाजपला त्याची लाज राहिली नाही. भाजपने नंगा नाच सुरू केला आहे. विरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई करायची. 'देशाच्या लोकशाहीला संपवण्याचे जे काम सुरू आहे. त्यासाठी आमची ही यात्रा आहे. गुजराती नेत्यांसाठी हे सरकार आहे. मलाईदर खात्यासाठी शिंदे सरकारमध्ये रस्सीखेच सुरू आहे. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे ब्लॅकमेल सरकार आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Nana Patole

  पुढील बातम्या