मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अननस विक्रेत्यांच्या भांडणात गेला ऊस विक्रेत्याचा जीव; नाशकातील विचित्र घटना वाचून बसेल धक्का

अननस विक्रेत्यांच्या भांडणात गेला ऊस विक्रेत्याचा जीव; नाशकातील विचित्र घटना वाचून बसेल धक्का

आरोपी पवन हंकारे याने मयत वडील शिवाजी हंकारे यांना जवळबन येथून दुचाकीवर बसवून साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले.

आरोपी पवन हंकारे याने मयत वडील शिवाजी हंकारे यांना जवळबन येथून दुचाकीवर बसवून साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले.

Murder in Nashik: नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी अननस खाल्ल्यावरून दोन अननस विक्रेत्यांमध्ये वाद झाल्यानंतर, यातील एका तरुणाने भांडणात मध्यस्थी करणाऱ्या ऊस रस विक्रेत्याची हत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk

नाशिक, 31 डिसेंबर: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला शहरात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी अननस खाल्ल्यावरून दोन अननस विक्रेत्यांमध्ये वाद  (dispute over ate pineapple) झाल्यानंतर, यातील एका तरुणाने भांडणात मध्यस्थी करणाऱ्या उसाचा रस विक्रेत्याची हत्या (sugarcane juice seller murder) केली आहे. आरोपी तरुणाने धारदार चाकूने डोक्यात वार करून उसाचा रस विक्रेत्या व्यक्तीचा खून केला आहे. या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्ती आणि संशयित आरोपी दोघंही परप्रातीय आहेत.

मनोजकुमार प्रभुदयाल कुशवाह असं हत्या झालेल्या व्यक्तीचे  नाव असून ते मुळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. गेल्या दहा वर्षांपासूने ते नाशिक जिल्ह्याच्या येवला शहरातील बुंदेलपुरा परिसरात वास्तव्याला आहेत. याठिकाणी ते आपले मेहुणे आणि पत्नीसोबत राहतात. मेहुण्याचा देखील उसाचा रस विक्रीचा व्यवसाय आहे. पण काही दिवसांपूर्वी मृत मनोज यांनी आपल्या गावाकडील ब्रिजेशकुमार रमाशंकर कुशवाह  आणि गुलाबसिंग नावाच्या दोन मुलांना धंदा आणि रोजगारासाठी नाशकात आणलं होतं. संबंधित दोघांना मनोज यांनी अननस विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला होता.

हेही वाचा-अल्पवयीन मुलीसोबत क्रूरतेचा कळस, रेपनंतर पिरगळली मान, राज्याला हादरवणारी घटना

दरम्यान, 30 डिसेंबर रोजी घटनेच्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास मृत मनोजकुमार जेवण करून घरासमोर बसले होते. यावेळी त्याठिकाणी संशयित आरोपी ब्रिजेशकुमार आला आणि त्याने गुलाबसिंग याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. गुलाबसिंग याने मनोजने आणलेलं अननस खाल्लं असून माझ्याशी वाद घातला असा आरोपी ब्रिजेशकुमार याने केला. पण अननस खाल्लं असेल तर खाऊ दे, वाद वाढवू नकोस अशी समज मनोज यांनी ब्रिजेशकुमार याला दिली.

हेही वाचा-लग्नात झालेल्या वादाची 3 वर्षांनी आली आठवण; तरुणाने ठोसा मारून पत्नीचा पाडला दात

पण काही वेळाने दोघं आपल्या रुमवर आल्यानंतर ब्रिजेशकुमारने पुन्हा गुलाबसिंग याच्यासोबत वाद उकरून काढला. यावेळी संतापलेल्या मनोजकुमार यांनी ब्रिजेशकुमार याला हाताने मारहाण करत ‘तू आता येथून निघून जा. आपण सकाळी बघू’ असं खडसावत हाकलून दिलं. रागाच्या तावात ब्रिजेशकुमारही घटनास्थळावरून निघून गेला. पण काही वेळाने साडेनऊच्या सुमारास ब्रिजेशकुमार पुन्हा घटनास्थळी आला.

हेही वाचा-4 मुलांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक घटनेनं जालना हादरलं

यावेळी मृत मनोजकुमार आपल्या मेहुण्यासह आणखी काही मित्रांसोबत रस्त्यावर उभं राहून गप्पा मारत होते. यावेळी आरोपी ब्रिजेशकुमारने पाठीमागून येऊन मनोजकुमार यांच्या डोक्यात चाकूने वार केला. मनोजकुमार रक्त्याच्या थारोळ्यात पडताच ब्रिजेश घटनास्थळावरून पसार झाला. अन्य उपस्थितांनी तातडीने मनोज यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी उपचारापूर्वीच मनोजकुमार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder, Nashik