मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : चालत्या ट्रकने घेतला पेट; नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

Video : चालत्या ट्रकने घेतला पेट; नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

आग लागल्याचे समजताच चालकाने प्रसंगवधान राखत ट्रकमधून उडी घेतली.

आग लागल्याचे समजताच चालकाने प्रसंगवधान राखत ट्रकमधून उडी घेतली.

आग लागल्याचे समजताच चालकाने प्रसंगवधान राखत ट्रकमधून उडी घेतली.

शहापूर, 21 मे : मुंबई-नाशिक (Mumbai Nashik Expressway) महामार्गावरील शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ फाट्या जवळ चालत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आग लागल्याचे समजताच चालकाने प्रसंगवधान राखून ट्रकमधून उतरल्याने चालक बचावला आहे. मात्र ट्रक या आगीत जळून खाक झाला आहे.

या घटनेमुळे  नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असून घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले आहे. ते ट्रक हटवण्याचं काम करीत आहेत.

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ट्रकने पेट घेतल्याचं दिसत आहे.

बातमी अपडेट होत आहे...

First published:

Tags: Live video, Mumbai, Nashik, Truck accident