मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाकरेंसह भाजप आणि मनसेलाही धक्का; नाशकातील नगरसेवकांचा मोठा गट शिंदेंसोबत जाणार

ठाकरेंसह भाजप आणि मनसेलाही धक्का; नाशकातील नगरसेवकांचा मोठा गट शिंदेंसोबत जाणार

शिंदे गट फक्त ठाकरे गटालाच नाही तर भाजप आणि मनसेला धक्का देणार आहे. नाशिकमधील शिवेसेना ठाकरे गटासह भाजप मनसेतील नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Kiran Pharate

नाशिक 25 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील राजकारणात दररोज मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी केलेल्या बंडानंतर अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही आता शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. आता नाशिकमध्ये शिंदे गटात अनेक नगरसेवक प्रवेश करणार आहेत.

बाळासाहेबांनी हेच संस्कार दिले का? भाजपाचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

यावेळी शिंदे गट फक्त ठाकरे गटालाच नाही तर भाजप आणि मनसेला धक्का देणार आहे. नाशिकमधील शिवेसेना ठाकरे गटासह भाजप मनसेतील नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडणार आहे. शिंदे गटाच्या निर्मितीनंतर नाशिकमधील हा सर्वात मोठा प्रवेश सोहळा असणार आहे.

यावेळी 17 हून अधिक नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 28 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या गुवाहाटी दर्शनानंतर हा पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आगामी पालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटात जाण्यासाठी आजी माजी नगरसेवकांची रीघ लागली आहे.

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधींनी टाळला सावरकरांचा मुद्दा? उद्धव ठाकरेंनी सांगितली Inside Story

नाशिकमध्ये शिंदे गटात नाराजी?

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही, बैठकांना बोलावलं जात नाही असं म्हणत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, यावर बोलताना दादा भुसे यांनी आमच्यात सर्व काही आलबेल असल्याचा दावा केलेला आहे. तर, पालकमंत्रीपदी दादा भुसे मंत्रालयात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हेमंत गोडसे यांनी बैठक घेतली होती. त्यावरूनही शिंदे गटात नाराजी दिसून येते.

First published:

Tags: Cm eknath shinde, Nashik, Shivsena