मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik Mercedes Accident : मर्सिडीजची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार, जमावाने कारमधील तिघांना चोपला

Nashik Mercedes Accident : मर्सिडीजची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार, जमावाने कारमधील तिघांना चोपला

नाशिककडे भरधाव जाणाऱ्या मर्सिडीज कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नाशिक, 17 जानेवारी : नाशिककडे भरधाव जाणाऱ्या मर्सिडीज कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. पिंपळकोठा गावाजवळील महामार्गावर हा अपघात झाला.

अपघातानंतर मर्सिडीज चालक व अन्य दोघांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी कारचालक व दोघा प्रवाशांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. पिंपळकोठा येथील नितीन जामसिंग पाटील, घनश्याम भानुदास बडगुजर हे दोघे दुचाकीने घरी जात होते. तर नारायण धनसिंग पाटील हा युवक रस्त्याच्या कडेने पायी शेतात जात होता.

हे ही वाचा : MLC election : काल शिवसेनेचा पाठिंबा अन् आज अर्ज माघारीच्या दिवशी शुभांगी पाटील गायब

पिंपळकोठा जवळील नाल्याजवळ मर्सिडीजने दुचाकीला समोरून धडक दिली. त्यामुळे तर नितीन पाटील व घनश्याम बडगुजर हे दोघे ठार झाले. तर नारायण पाटील गंभीर जखमी झाला.

जळगावमध्ये मद्यधुंद चालकाचा बेधुंद प्रकार

जळगाव शहरातील नवी पेठ गोलाणी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान एका मद्यधुंद ट्रकचालकाने भरधाव वेगात ट्रक चालवत एसटी बस सह पाच दुचाकींना धडक दिली असून या अपघातात तीन दुचाकी चालक किरकोळ जखमी झाले आहेत. 

हे ही वाचा : ग्रुप तयार करून शोधला होता बंगला, पोलिसांनी सांगितला शहर हदरवणाऱ्या दरोड्याचा मास्टर प्लॅन

मात्र स्थानिकांनी तात्काळ ट्रकचालकाचा पाठलाग करून ट्रक थांबवण्यात यश मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान अपघातातील जखमी झालेल्या संतप्त वाहनधारकांनी ट्रकचालकाला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

First published:

Tags: Accident, Nashik