मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'माझी माय गोदा माय', गोदावरीच्या विविध रुपांचं दर्शन घेण्याची नाशिककरांना संधी! पाहा Video

'माझी माय गोदा माय', गोदावरीच्या विविध रुपांचं दर्शन घेण्याची नाशिककरांना संधी! पाहा Video

'माझी माय गोदा माय' भव्य छायाचित्र प्रदर्शन नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात भरविण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक 14 नोव्हेंबर : दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मध्ये झाला आहे. गोदावरी नाशिक शहरातूनच पुढे मार्गक्रमण करते. तसेच गोदावरीला धार्मिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे गोदावरीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील गोदाप्रेमी सतत झटत असतात. मात्र, मागील काळात गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा हा चांगलाच गाजला होता. प्रदूषणमुक्त गोदावरी व्हावी म्हणून अनेक प्रयत्न देखील केले गेले. मात्र, हे सारं होत असताना गोदावरीची विविध सुंदर रूप सर्वांच्या नजरेस यावी म्हणून रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स सार्वजनिक वाचनालय आयोजित 'माझी माय गोदा माय' भव्य छायाचित्र प्रदर्शन नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात भरविण्यात आले आहे.

सोमवार,मंगळवार असे दोन दिवस हे प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात नाशिक शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रसिद्ध छायाचित्रकारांनी गोदावरीची विविध रूपं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली आहेत. त्यांचंच प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

Children Day : 5 ॲप्स आणि 3 वेबसाईट बनवणारी नाशिकची अँड्रॉईड गर्ल, पाहा Video

गोदावरीचा प्रचार प्रसार होण्याकरिता प्रयत्न

गोदावरीला धार्मिक महत्व आहे. तसेच नाशिककरांची प्रचंड श्रद्धा आहे. सद्या स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरीचे सुशोभीकरण सुरू आहे. मात्र, गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे वारंवार सोशल मिडियाच्या माध्यमातून समोर येत असते. परंतु गोदावरीचे विलोभनीय रूप सुद्धा आहे. हे नाशिककरांच्या समोर मांडल आहे. तिच्या विविध रूपांचे सर्वांना दर्शन व्हावे. तसेच कुंभमेळा किंवा इतर उत्सवामध्ये देखील गोदावरीला किती महत्त्व असते,हे यातून अधोरेखित होते. विशेष म्हणजे गोदावरी संदर्भातील पर्यटनाला चालना मिळावी हा देखील या मागचा हेतू आहे. देशातूनच नव्हे तर परदेशातून येणाऱ्या नागरिकांना देखील गोदावरीचा हेवा वाटावा,विविध माध्यमांतून प्रचार प्रसार व्हावा हा आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आयोजक धनंजय बेळे यांनी दिली आहे.

गुगल मॅपवरून साभार

कुठे आहे हे 'माझी माय गोदा माय प्रदर्शन

नाशिक शहरातील सार्वजनिक वाचनालय, औंरंगाबादकर सभागृह,शालिमार या ठिकाणी हे प्रदर्शन सुरू आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन बघता येणार आहे. सोमवार मंगळवार असे दोन दिवस प्रदर्शन सुरू राहील.

Nashik : मूकबधीर जोडप्याचा पाणीपुरी स्टॉल, नाशिककरांचा बनला प्रेरणास्थान! Video

गोदावरीच्या अनेक रुपांच दर्शन

एकाच प्रदर्शनात गोदावरीच्या इतक्या रूपांच दर्शन होन आणि ते मनमोकळ्या पणाने बघता येणं ही खरोखर नाशिककरांसाठी पर्वणी आहे. आयोजकांनी अतिशय सुंदर नियोजन केले आहे. गोदावरीचे अनेक ऐतिहासिक छायाचित्र देखील या प्रदर्शनात मांडली आहेत. त्यामुळे सर्वांनीच या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी प्रतिक्रिया प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या निता कदम यांनी दिली आहे.

गोदावरीचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद

फोटोग्राफी हा माझा छंद आहे. मी विविध ठिकाणचे फोटो शूट केले आहेत. मात्र, गोदावरीचे विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात कैद करतानाचा जो आनंद असतो. तो फार वेगळा असतो. माझा जन्मच नाशिकमध्ये झाला असल्यामुळे गोदावरीच्या विविध रूपांचे दर्शन मला झाले आहे. मी आतापर्यंत अनेक छायाचित्र गोदावरीची टिपली आहेत. त्यातीलच काही छायाचित्र या प्रदर्शनात मांडली आहेत. 'माझी माय गोदा माय' या भव्य छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला गोदावरीची विविध रूपं बघायला मिळतील. त्यामुळे सर्वांनीच हे प्रदर्शन बघावे अशी प्रतिक्रिया व्हिडिओ जर्नालिस्ट मयूर बारगजे यांनी दिली आहे.

First published:

Tags: Local18, Nashik