नाशिक, 09 जानेवारी: नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील गिरणा नदीपात्रात एका तरुणाने उडी घेऊन (Jump into river) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित युवकाने आपल्या घरच्यांना व्हिडीओ कॉल (Video call) करून नदीपात्रात उडी घेतली आहे. नाका तोंडात पाणी शिरून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत.
सुनील भगवान माळी असं आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत सुनील हा सटाणा तालुक्यातील उमाजीनगर येथील रहिवासी होता. शुक्रवारी (7 जानेवारी) रोजी त्याने देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील एका पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. तत्पूर्वी त्याने व्हिडीओ कॉल करत आपल्या कुटुंबाशी संवाद साधला होता. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-बापाने जंगलात नेऊ 10 वर्षांच्या लेकीला फासावर लटकवले आणि रचला खूनाचा कट, पण...
घरगुती भांडण आणि दारुच्या नशेत त्यानं हे धक्कादायक पाऊल उचचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने सुनीलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. यावेळी घटनास्थळी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा-पॉर्न VIDEO दाखवून विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार, पतीसह सासरच्यांवर FIR दाखल
किरकोळ घरगुती कारणातून 32 वर्षीय सुनीलने अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. प्राथमिक तपासाच्या आधारावर देवळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सुनीलच्या आत्महत्येला आणखी वेगळं काही कारण असू शकतं का ? याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nashik, Suicide